नवी दिल्ली : वित्त वर्ष-२०२१ मध्ये मुकेश अंबानी आणि सुनील भारती मित्तल यांना आपल्या कंपनीचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यापैकी एका पदाचा त्याग करावा लागणार आहे.
सूचीबद्ध कंपन्यांसाठी बाजार नियामक सेबीने नवे नियम तयार केले आहेत. १ एप्रिल २०२० पासून या नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या नियमानुसार, चेअरमन आणि एमडी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे कंपन्यांना ठेवता येणार नाहीत. चेअरमन हे पदही नव्या नियमात अ-कार्यकारी करण्यात आले आहे. औद्योगिक व्यवस्थापन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सेबीने कोटक समितीची नियुक्ती केली होती. समितीने केलेल्या अनेक शिफारशींत ही एक महत्त्त्वाची शिफारस होती.
२९१ कंपन्यांमध्येही एकाच व्यक्तीकडे
सेबीच्या प्राईम डाटाबेसनुसार १८ जुलैपर्यंत एनएसईमध्ये सूचीबद्ध ५00 बड्या कंपन्यांपैकी २९१ कंपन्यांना अ-कार्यकारी चेअरमनची नियुक्ती करावी लागणार आहे. हे प्रमाण ५८.२ टक्के आहे. यात रिलायन्स इंडस्ट्रीज, इन्फोसिस, टीसीएस, भारतीय एअरटेल आदी कंपन्यांच्या समावेश आहे.
कंपनी चेअरमन किंवा एमडीचे पद सोडा; सेबीचे नवे नियम
कोटक समितीने केले होती शिफारस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:11 AM2018-07-24T00:11:09+5:302018-07-24T00:12:06+5:30