Join us

एलईडी दिवे महागणार; उत्पादकांची संघटना भेटणार सरकारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2021 11:12 PM

संघटनेचे अध्यक्ष सुमीत जाेशी यांनी सांगितले की, एलईडी दिव्यांसाठी लागणारे एलईडी दिवे, पीसीबी इत्यादी साहित्य आयात करावे लागते. भारतात या साहित्याची निर्मिती हाेत नाही किंवा खूप कमी उपलब्धता आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने सीमाशुल्कात वाढ केल्यामुळे एलईडी दिवे व त्यावर आधारित इतर उपकरणांच्या खर्चात वाढ हाेणार आहे. परिणामी देशांतर्गत उत्पादन हाेणाऱ्या उत्पादनांच्या किमतीत वाढ हाेण्याची शक्यता आहे. या निर्णयासंदर्भात फेरविचार करण्याच्या मागणीसाठी इलेक्ट्रिक दिवे आणि कम्पाेनेंट उत्पादकांची संघटना (एल्काेमा) सरकारला निवेदन देणार आहे.संघटनेचे अध्यक्ष सुमीत जाेशी यांनी सांगितले की, एलईडी दिव्यांसाठी लागणारे एलईडी दिवे, पीसीबी इत्यादी साहित्य आयात करावे लागते. भारतात या साहित्याची निर्मिती हाेत नाही किंवा खूप कमी उपलब्धता आहे. त्यामुळे नजीकच्या काळात किमती वाढतील. सरकारच्या धाेरणांचा उद्याेगांना दीर्घकालीन लाभ हाेईल. मात्र, हे साहित्य भारतात तयार झाल्यानंतरच फायदा आहे. सरकारने सीमाशुल्क ५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे. मात्र, उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळे  किमतीवर थेट परिणाम हाेणार नाही. आयातीमुळे खर्च वाढणारएलईडी दिव्यांच्या निर्मितीसाठीचे सुमारे ३५ ते ४० टक्के साहित्य चीन, दक्षिण काेरिया आणि व्हिएतनाम येथून आयात करावे लागते. सरकारच्या निर्णयामुळे ५ ते १० टक्के किमती वाढतील. हा उद्याेग जवळपास दहा हजार काेटी रुपयांचा असून, त्यापैकी ६० टक्के वाटा हा सर्वसामान्य ग्राहकांचा आहे.