नवी दिल्ली : खर्चाचा वाढीव बोजा पडल्यामुळे जेट एअरवेजची वैधानिक देणी (स्टॅट्यूटरी ड्यू) ३१ मार्च २0१८ पर्यंत दुपटीने वाढून ५१0 कोटी रुपये झाली आहेत. गेल्या वर्षी वित्त वर्ष २0१७ मध्ये ती २३९ कोटी रुपये होती.
नरेश गोयल यांच्या नेतृत्वाखालील जेट एअरवेजची वित्त वर्ष २0१६ च्या अखेरीस वैधानिक देणी जवळपास २३९ कोटीच होती. त्यानंतर, वर्षभरात त्यात वाढ झाली नाही. ३१ मार्च २0१८ ला संपलेल्या वित्त वर्षात मात्र त्यात दुपटीने वाढ झाली आहे. कंपनीच्या ताज्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
वैधानिक देण्यात सरकारकडे हस्तांतरित करावयाच्या पीएफ व टीडीएससारख्या देणदारीचा समावेश आहे का, या प्रश्नावर जेटच्या प्रवक्त्याने सांगितले की, ही नेहमीची देणी आहेत. टीडीएस, जीएसटी, पीएफ इत्यादींचा त्यात समावेश आहे. ३१ मार्च २0१८ रोजीचा हा आकडा आहे. योग्य देय तारखेला ही देणी दिली गेली आहेत. वित्त वर्ष २0१८ मध्ये जीएसटीमुळे कंपनीच्या वैधानिक देणदारीत वाढ झाली आहे.
याबाबत कंपनी प्रवक्ता म्हणाला की, कंपनी आपली सर्व वैधानिक देणी योग्य वेळी अदा करीत आली आहे. कोणत्याही प्रकारची वैधानिक देणी अतिरिक्त काळ थकलेली नाहीत.
२,००० ते ३,००० कोटी उभारण्याच्या प्रयत्नात
आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल हे सध्या त्यांचे मालकी हक्क विकून २,००० ते ३,००० कोटी रुपये उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी माहिती कंपनीमधील सूत्रांनी दिला. कंपनीने यापूर्वीच अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपन्या उदा. ब्लॅकस्टोन, हीपीजी व इंडिगो कॅपिटलशी गुंतवणूक करण्यासाठी मालकी हक्क देण्याची बोलणी सुरू केली आहेत.
जेट एअरवेजची वैधानिक देणी दुपटीने वाढून ५१0 कोटींवर
खर्चाचा वाढीव बोजा पडल्यामुळे जेट एअरवेजची वैधानिक देणी (स्टॅट्यूटरी ड्यू) ३१ मार्च २0१८ पर्यंत दुपटीने वाढून ५१0 कोटी रुपये झाली आहेत. गेल्या वर्षी वित्त वर्ष २0१७ मध्ये ती २३९ कोटी रुपये होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 06:25 AM2018-08-14T06:25:34+5:302018-08-14T06:26:38+5:30