Lokmat Money > बिझनेस न्यूज > तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा लिनोव्होचा ‘पी 2’ भारतात लॉन्च

तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा लिनोव्होचा ‘पी 2’ भारतात लॉन्च

या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा

By admin | Published: January 11, 2017 10:36 PM2017-01-11T22:36:08+5:302017-01-11T23:32:32+5:30

या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा

Lenovo's 'P2', which offers a battery backup of three days, launches in India | तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा लिनोव्होचा ‘पी 2’ भारतात लॉन्च

तीन दिवस बॅटरी बॅकअप देणारा लिनोव्होचा ‘पी 2’ भारतात लॉन्च

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 11 - लिनोव्हो कंपनीने त्यांचा बहुप्रतिक्षित लिनोव्हो पी 2 हा फ्लॅगशिप स्मार्टफोन लॉन्च केला आहे.  या फोनचं दमदार वैशिष्ट्य म्हणजे फोनची बॅटरी. या फोनची बॅटरी तीन दिवस चालेल तसेच केवळ दोन तासात चार्ज होईल असा कंपनीचा दावा आहे. तब्बल 5100 मिलीअँपिअर बॅटरी क्षमता आहे. अवघ्या 15 मिनिटांमध्ये दहा तासांपर्यंत चालण्याइतपत बॅटरी चार्ज होत असल्याचा कंपनीचा दावा आहे. 

दोन व्हेरिएंट्समद्ये हा फोन उपलब्ध आहे. 3 GB रॅम असलेल्या फोनची किंमत 16,999 तर 4  GB रॅम असलेल्या फोनची किंमत 17,999 इतकी असणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा फोन फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार आहे. फोनमध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असून मायक्रोएसडी कार्डद्वारे मेमरी 128 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. 
 
अँड्रॉईडच्या मार्शमेलो या ऑपरेटिंग सिस्टीमला सपोर्ट करणारा हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन या प्रोसेसरवर आधारीत आहे. फोनमध्ये 13 आणि 5 मेगापिक्सल्सचे कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनला 5.5 इंच फुल एचडी स्क्रीन म्हणजेच 1920 बाय 1080 पिक्सल्स क्षमतेचा अमोलेड डिस्प्ले आहे. 

Web Title: Lenovo's 'P2', which offers a battery backup of three days, launches in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.