मुंबई : राज्यातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) पुनरुज्जीवित करण्यासाठी सरकारने घसघशीत पॅकेज जाहीर केले आहे. परंतु, त्याशिवाय देशात शेती, मासेमारी, जैव इंधन, कागदनिर्मिती इतकेच काय आइसक्रीमचे चमचे आणि अगरबत्तीच्या काड्यांच्या उत्पादनांसाठी आता एमएसएमईनी पुढाकार घ्यायला हवा. त्यातून लाखो कोटी रुपयांची उलाढाल सहज शक्य असून परदेशी कंपन्यांवरील अवलंबित्व कमी होईल. अशा प्रयत्नांतून देशातील आयात कमी करीत निर्यातीला गती द्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होईल. गरिबीचेही उच्चाटन होईल. भारताच्या समृद्धीचा हाच मार्ग असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी केले.कोरोनाच्या प्रकोपामुळे कोसळलेल्या संकटातून प्रगतीच्या नव्या दिशा धुंडाळण्यासाठी लोकमत माध्यम समूहाने ‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी’ ही वेबिनार सीरिज सुरू केली आहे. ह्यद फ्यूचर आॅफ एमएसएमई सेक्टरह्ण या वेबिनारच्या माध्यमातून या सीरिजचे पहिले पुष्प गुंफण्यात आले. त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून गडकरी बोलत होते. संकटात असलेल्या एमएसएमईला उभारी देण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न आणि देशासमोरील प्रगतीच्या नव्या संधींचा आलेख त्यांनी या वेळी मांडला.जागतिक स्पर्धेत उतरायचे असेल, परदेशी गुंतवणूक आकर्षित करायची असेल, रोजगारनिर्मिती करून गरिबी दूर करायची असेल तर त्या विकासासाठी आपल्याला अनुरूप बदल करावे लागतील. त्यासाठी कामगार कायदे, विविध विभागांच्या मंजुरी प्रक्रियेतील लाल फितीचे अडथळे, भूसंपादनातील अडचणी, भ्रष्टाचार अशा असंख्य आघाड्यांवर सकारात्मक बदल करावेच लागतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. एमएसएमई क्षेत्रात ऊर्जा फुंकण्यासाठी अत्यंत अनुकूल घोषणा केंद्र सरकारने केल्या आहेत. त्यामुळे उद्योगांची गती वाढेल आणि चक्र फिरेल. व्याख्या बदलल्यामुळे सर्व्हिस सेक्टरसह हॉटेल, रिटेल, पर्यटन अशा असंख्य क्षेत्रांचा समावेश एमएसएमई म्हणून होईल आणि त्यांना या पॅकेजमधील तरतुदींचा पुरेपूर फायदा घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही परिस्थितीत देशाची अर्थव्य वस्था पाच ट्रिलियन डॉलर्सची करण्याचे ध्येय पूर्ण करायचे आहे. पाच वर्षांत पाच कोटी नवे रोजगार निर्माण करायचे आहेत. देशाचा जीडीपी वाढीचा दर ८ टक्के आणि कृषी क्षेत्रातील वाढ १८ टक्यांपर्यंत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असून ते नक्की साध्य करू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उद्योगांसाठी पोषक वातावरण हवेलोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांचे मतलाल फितीच्या कारभारामुळे प्रकल्पांसाठी वेळेवर मंजुऱ्या मिळत नाहीत. मारुतीसारख्या अनेक उद्योगांनी त्यामुळेच महाराष्ट्राबाहेरचा रस्ता धरला. चीनमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असलेले उद्योगधंदे आज भारत नव्हे, तर व्हिएतनाम, बांगलादेश यांसारख्या देशांना पसंती देत आहेत. देशात सुरू झालेले प्रकल्प कधीच वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यात खर्च वाढ होते. ही सारी परिस्थिती का उद्भवते, याचा गांभीर्याने विचार करून उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करणे अत्यावश्यक असल्याचे मत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन आणि माजी खासदार विजय दर्डा यांनी या वेबिनारमध्ये मांडले. आज रस्त्यावरील भाजी विक्रेत्यापासून ते रिलायन्स कंपनीच्या मालकापर्यंत प्रत्येक जण अडचणीत आहे. केंद्र सरकारने एमएसएमईसाठी पॅकेज जाहीर केले. मात्र, सध्याच्या परिस्थितीत कामगार आणि कच्च्या मालाचा अभाव, बंद वाहतूक व्यवस्था, पतपुरवठा अशा अनेक आघाड्यांवरील आव्हाने त्यांच्यासमोर उभी आहेत. सद्य:स्थितीत त्यातून बाहेर पडत उद्योग सुरू करणे शक्य होईल का? असा कळीचा मुद्दाही त्यांनी या वेळी उपस्थित केला. सध्या देशातील अनेक नकारात्मक बाबींकडे बोट दाखविले जाते. मात्र, या काळात सकारात्मक भावना घेऊनच प्रत्येकाला पुढे जायला हवे. महाराष्ट्राने कायम देशाला दिशा दाखविली आहे. यापुढेही ती परंपरा कायम राहील, असा विश्वास दर्डा यांनी व्यक्त केला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जबाबदारीने पुरुषार्थ गाजवत आसल्याचे सांगत त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच, एमएसएमईसाठी आवाज उठविणारे नितीन गडकरी हे देशातील एकमेव मंत्री आहेत. ते जे बोलतात ते करून दाखवतात. त्यामुळे त्यांच्यावर प्रत्येकाचा विश्वास असल्याचे सांगत दर्डा यांनी गडकरी यांच्या कामाचीही प्रशंसा केली. गुरुवारी विजय दर्डा यांचा वाढदिवस असल्याने वेबिनारला उपस्थित असलेल्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.आजच्या वेबिनारमध्ये सुभाष देसाई‘पुनश्च भरारी - आव्हाने आणि संधी’ अंतर्गत शुक्रवारी होणाºया विशेष वेबिनारमध्ये प्रमुख अतिथी आहेत महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई. १५ मे रोजी दुपारी ११ ते १ या वेळेत होणाºया या वेबिनारमध्ये देसाई यांच्यासह लोकमत माध्यम समूहाचे एडिटर इन चिफ तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा, बीव्हीजी इंडियाचे चेअरमन हणुमंत गायकवाड, विको लॅबोरेटरीजचे संजीव पेंढारकर, एसएमई चेंबर आॅफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत.रजिस्ट्रेशनसाठी लिंक : https://bit.ly/2LofZpQप्रथम येणाºयास प्राधान्य या तत्त्वावर रजिस्ट्रेशन केले जाईल.वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी लिंक आणि अन्य माहिती नोंदणी केलेल्या ई मेल आयडी किंवा मोबाइल क्रमांकावर पाठविली जाईल.