Join us  

मोठा करार; LIC ने मुकेश अंबानींच्या Jio Fin मध्ये मिळवली 6.66% भागीदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 8:07 PM

मुकेश अंबानींच्या कंपनीत हिस्सा मिळवल्यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्येही वाढ झाली आहे.

देशातील सर्वात मोठ्या आणि सरकारी मालकीच्या विमान कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) ने मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्यासोबत मोठा करार केला आहे. LIC ने जिओ फायनान्शियल सर्व्हिसेज (JFSL) मध्ये 6.66 टक्के भागीदारी मिळवली आहे. LIC ने सांगितले की, त्यांना ही भागीदारी डीमर्जर प्रोसेसद्वारे मिळाली आहे. LIC ने शेअर बाजाराला ही माहिती दिली आहे. 

LIC Share वर दिसला परिणाममुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये स्टेक घेतल्याच्या बातम्यांचा परिणाम 4.20 लाख कोटी रुपये मार्केट कॅप असलेल्या एलआयसी शेअर्सवरही दिसून आला. कंपनीने हा करार जाहीर केल्यानंतर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचा शेअर एक टक्क्यांहून अधिक वधारला. आजचे सत्र संपेपर्यंत एलआयसीचा शेअर 1.74 टक्क्यांच्या वाढीसह 663.25 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत होता. 

जिओ फिनमध्ये दोन दिवसांपासून लोअर सर्किटजिओ फायनान्शियल सर्व्हिसेजच्या शेअरबद्दल बोलायचे झाल्यास, 21 ऑगस्टला लिस्टिंग- झाल्यावर शेअरमध्ये लोअर सर्किट पाहायला मिळाले. दुसऱ्या दिवशीही कंपनीचा स्टॉकत्याच किमतीवर होता. मंगळवारी शेअर बाजार सुरू होताच Jio Fin Share मध्ये लोअर सर्किट लागला. हा पाच टक्के कमी होऊन 236.45 रुपयांवर आला. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे मार्केट कॅप 1.60 लाख कोटी रुपये आहे.

अंबानी कुटुंबाचा 46% हिस्साडिमर्जरनंतर रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंटचे नाव बदलून जिओ फायनान्शियल करण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडपासून वेगळी झालेल्या जिओ फिनमध्ये अंबानी कुटुंबाचा 46 टक्के हिस्सा आहे. LIC कंपनीच्या प्रमुख भागधारकांपैकी एक आहे. 20 जुलै रोजी डी-मर्जरनंतर, Jio Financial Services चे स्टॉक व्हॅल्यू प्रति शेअर 261.85 रुपये निश्चित करण्यात आले होते. 

(नोट- आम्ही फक्त शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देत आहोत. कुठलीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :एलआयसीरिलायन्समुकेश अंबानीजिओशेअर बाजारशेअर बाजार