Lokmat Money > बिझनेस न्यूज > LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ!

LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ!

LIC Share Market News: शेअर मार्केटमधील वाढीमुळे LIC ला चांगलाच फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 04:37 PM2023-12-10T16:37:39+5:302023-12-10T16:38:06+5:30

LIC Share Market News: शेअर मार्केटमधील वाढीमुळे LIC ला चांगलाच फायदा झाल्याचे सांगितले जात आहे.

lic among biggest gainers market cap of 10 most valued companies in share market last week | LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ!

LICला छप्परफाड फायदा! आठवडाभरात ६५५५८ कोटींची कमाई; मार्केट कॅपमध्ये झाली मोठी वाढ!

LIC Share Market News: गेल्या आठवड्यात शेअर मार्केटमध्ये मोठी उलाढाल दिसून आली. शेअर बाजाराच्या निर्देशांकातील वाढीमुळे अनेक गुंतवणूकदार मालामाल झाले. देशाची सर्वांत मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीला शेअर मार्केट वाढीचा मोठा फायदा झाल्याचे सांगितले जात आहे. आठवडाभरात एलआयसीने कोट्यवधींची कमाई केली आहे. 

देशातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी ७ कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ३.०४ लाख कोटी रुपयांची वाढ झाली. यामध्ये एचडीएफसी बँक आणि एलआयसीमध्ये सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली. खाजगी क्षेत्रातील HDFC बँकेचे बाजार मूल्य ७४,०७६.१५ कोटींनी वाढून १२,५४,६६४.७४ कोटी झाले. तर, देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LICचे मार्केट कॅप ६५,५५८.६ कोटी रुपयांनी वाढून ४,८९,४२८.३२ कोटी रुपये झाले आहे. एलआयसीच्या समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला.

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मूल्यवान कंपनी ठरली आहे. त्यानंतर टीसीएस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड, भारती एअरटेल, आयटीसी, एसबीआय आणि एलआयसी यांचा क्रमांक लागला. शेअर मार्केटच्या आकडेवारीनुसार, गेल्या आठवड्यात देशातील टॉप १० कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजार भांडवलात ०३,०४,४७७.२५ कोटी रुपयांची वाढ झाली. 
 

Web Title: lic among biggest gainers market cap of 10 most valued companies in share market last week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.