Join us  

LIC बनली देशातील आठवी सर्वात मोठी कंपनी, आता सरकारी कंपन्यांमध्ये फक्त SBI च्या मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 4:24 PM

आज लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत, यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल ७.३४ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

सरकारी विमा कंपनी एलआयसीच्या नावावर आता एक नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आले आहे.  LIC च्या शेअर्सने सोमवारी २६ जुलै रोजी बीएसईवर १,१७८.६० रुपयांचा नवा उच्चांक गाठला आहे. याआधी, एलआयसीचा उच्चांक १,१७५ रुपये प्रति शेअर होता, हा उच्चांक या वर्षीचा फेब्रुवारी महिन्यात झाला होता.

आज एलआयसीचे शेअर्स सुमारे अडीच टक्क्यांनी वधारले आहेत. यामुळे सरकारी विमा कंपनीचे बाजार भांडवल ७.४८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आता एलआयसी ही भारतातील आठवी सर्वात मोठी लिस्टेड कंपनी बनली आहे. सरकारी कंपन्यांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर दुसऱ्या क्रमांकावर एलआयसी  आहे.

Share Market Closing Bell : ५ दिवसांची घसरण अखेर थांबली, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये तेजी; IT, मेटल शेअर्समध्ये तेजी

या वर्षाच्या सुरुवातीला फक्त ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड LIC च्या आसपास असल्याचे दिसत आहे. यात ३२.९३ टक्के परतावा दिला आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा स्टॉक ६.३१ ने वाढला आहे. SBI लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये १८.६६ टक्के वाढ झाली आहे.

एलआयसीने खासगी क्षेत्रातील आयडीएफसी फर्स्ट बँकेतही आपला हिस्सा वाढवला आहे. सरकारी मालकीच्या विमा कंपनीने ४ जुलै रोजी IDFC फर्स्ट बँक लिमिटेड मधील हिस्सेदारी ०.२० टक्क्यांनी वाढवल्याचे एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. ८०.६३ रुपये प्रति शेअर या दराने प्रायव्हेट प्लेसमेंट ऑफरद्वारे गुंतवणूक करून त्यांनी बँकेतील आपला हिस्सा वाढवला आहे.

मोठा परतावा

एलआयसीचा IPO मे २०२० मध्ये आला. हे शेअर मार्केटमध्ये ८२६.१५ रुपयांच्या किंमतीला लिस्टेड झाले.एलआयसीने आतापर्यंत एकूण ४५ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी आतापर्यंत एलआयसीचा परतावा ३८ टक्क्यांहून अधिक आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी या बेंचमार्क निर्देशांकांपेक्षा हा आकडा खूप जास्त आहे, त्यांनी या कालावधीत अनुक्रमे ११.२४ टक्के आणि १२.८६ टक्के परतावा दिला आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला फक्त ICICI प्रुडेंशियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड LIC च्या आसपास असल्याचे दिसते, कंपनीने ३२.९३ टक्के परतावा दिला आहे. एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा स्टॉक ६.३१ ने वाढला आहे. SBI लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडच्या शेअर्समध्ये १८.६६ टक्के वाढ झाली आहे.

टॅग्स :एलआयसीव्यवसाय