एलआयसीच्या शेअरमध्ये बुधवारी सकाळी व्यवहाराच्या सुरुवातीलाच २ टक्क्यांनी वाढ झाली. यामुळे एलआयसीच्या मार्केट कॅपने ५.८ लाख कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे. एलआयसीच्या शेअरने ५२ आठवड्याच्या ९१९.४५ प्रति शेअर रुपयांच्या उच्च स्तरावर आहे.
शेअर बाजारात पुन्हा घसरण, नफावसूलीमुळे गुंतवणूकदारांचे ₹१.१ लाख कोटी बुडाले
या आठवड्यात एलआयसीने मार्केट कॅपमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाला मागे टाकले आहे. यामुळे आता एलआयसी देशातील सर्वात मुल्यवान पीयूएसयू कंपनी बनली आहे. बीएसई वर एसबीआयचे शेअर १ टक्क्यांच्या कमकुवतीवर दिसत आहेत. याचे मार्केट कॅप ५.६२ लाख कोटी रुपये होते, नोव्हेंबर सुरुवातीला एलआयसीच्या शेअरची किंमतीमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त वाढल्या आहेत.
काल शेअर बाजारात घसरण झाली
मागील काही दिवसापासून भारतीय शेअर मार्केट तेजीत सुरू होते. आज याला ब्रेक लागला असून बीएसई सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला. तर निफ्टी २२,०५० च्या खाली घसरला. यामुळे आज शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे सुमारे १.१ लाख कोटी रुपये बुडाले. आज फक्त धातू आणि तेल आणि वायू समभागांच्या निर्देशांकात वाढ दिसून आली. इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांक रेड मध्ये बंद झाले. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्ये विक्री झाली.
दिवसाच्या शेवटी, बीएसई सेन्सेक्स १९९.१६ अंकांनी किंवा ०.२७% घसरून ७३,३२७.९४ वर बंद झाला. तर एनएसई (NSE) चा ५० शेअर्सचा निर्देशांक निफ्टी ६५.१५ अंकांनी घसरला आणि २२,०३२.३० च्या पातळीवर बंद झाला.