Lokmat Money > बिझनेस न्यूज > एलआयसी 1 फेब्रुवारीपासून 23 योजना बंद करणार; लाभ मिळणार नाही

एलआयसी 1 फेब्रुवारीपासून 23 योजना बंद करणार; लाभ मिळणार नाही

नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) जीवन विमा कंपन्यांना काही योजना बंद करण्यास सांगितले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 03:13 PM2020-01-21T15:13:21+5:302020-01-21T15:31:27+5:30

नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) जीवन विमा कंपन्यांना काही योजना बंद करण्यास सांगितले होते.

LIC to close 23 schemes from 1st February 2020; Cannot be taken advantage by customer | एलआयसी 1 फेब्रुवारीपासून 23 योजना बंद करणार; लाभ मिळणार नाही

एलआयसी 1 फेब्रुवारीपासून 23 योजना बंद करणार; लाभ मिळणार नाही

Highlightsनवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. सध्या अस्तित्वात असलेल्या पॉलिसींमध्ये बदल किंवा पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी कंपन्यांना 29 फेब्रुवारी 2020 ची मुदत देण्यात आली आहे. 

जर तुम्ही एलआयसीच्या कोणत्या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. सावध अशासाठी व्हा कारण, एलआयसी 31 जानेवारीपासून जवळपास दोन डझनावर योजना बंद करणार आहे. याचाच अर्थ 1 फेब्रुवारपासून या योजनांचा लाभ घेता येणार नाहीय. 


नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (इरडा) जीवन विमा कंपन्यांना काही योजना बंद करण्यास सांगितले होते. नवीन मार्गदर्शक तत्वांनुसार ज्या योजना त्यामध्ये बसत नाहीत त्या बंद करण्याचे आदेश दिले होते. तसेच कंपन्यांना अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2019 देण्यात आली होती. मात्र, ही मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेल्या पॉलिसींमध्ये बदल किंवा पुन्हा परवानगी मिळविण्यासाठी कंपन्यांना 29 फेब्रुवारी 2020 ची मुदत देण्यात आली आहे. 

हे 23 प्लॅन बंद होणार.....

  • एलआयसी भाग्यलक्ष्मी प्लान
  • एलआयसी आधार स्तंभ
  • एलआयसी आधार शिला
  • एलआयसी जीवन उमंग
  • एएलआयसी जीवन शिरोमणि
  • एलआयसी विमा श्री
  • एलआयसी माइक्रो बचत
  • एलआयसी न्यू एंडोमेंट प्लस (यूलिप)
  • एलआयसी प्रीमियम वेवर रायडर (रायडर)
  • एलआयसी न्यू ग्रुप सुपरएन्युएशन कॅश एक्युमुलेशन प्लान (ग्रुप प्लान)
  • एलआयसी न्यू ग्रुप ग्रेच्युटी कॅश एक्युमुलेशन प्लान (ग्रुप प्लान)
  • एलआयसी न्यू ग्रुप लीव इनकैशमेंट प्लान (ग्रुप प्लान)
  • एलआयसी सिंगल प्रीमियम एंडोमेंट प्लान
  • एलआयसी न्यू एंडोमेंट प्लान
  • एलआयसी न्यू मनी बॅक-20 साल
  • एलआयसी न्यू जीवन आनंद
  • एलआयसी अनमोल जीवन-II
  • एलआयसी लिमिटेड प्रीमियम एंडोमेंट प्लान
  • एलआयसी न्यू चिल्ड्रंस मनी बैक प्लान
  • एलआयसी जीवन लक्ष्य
  • एलआयसी जीवन तरुण
  • एलआयसी जीवन लाभ प्लान 
  • एलआयसी न्यू जीवन मंगल प्लान
     

इरडाला विमा पॉलिसी ग्राहकोभिमुख बनवायची आहे. यामुळे ग्राहकाला जास्तीतजास्त फायदा पोहोचविण्याचा उद्देश आहे. अनेक एजंट चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगून, फसवून पॉलिसीची माहिती न देता विकतात. यावर लगाम लावण्याचा मुख्य उद्देश आहे. या संदर्भातच इरडाने मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.

Web Title: LIC to close 23 schemes from 1st February 2020; Cannot be taken advantage by customer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.