Join us

LIC कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! २० टक्के पगारवाढ होणार; केंद्राचा लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 4:30 PM

LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून, २० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ठळक मुद्देLIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी२० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होण्याची शक्यताऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ नाही

नवी दिल्ली: भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC च्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आगामी आठवडाभरात केंद्र सरकार पगारवाढीबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या प्रस्तावाला अर्थ मंत्रालयाने तत्वतः मंजुरी दिली असून, २० टक्क्यांपर्यंत पगारवाढ होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (lic employees may get 20 percent salary hike after wage revision soon)

LIC च्या कर्मचाऱ्यांची यंदा पगारवाढ निश्चित मानली जात आहे. एलआयसी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतन वाढीची शिफारस अर्थ मंत्रालयाला केली असून, येत्या आठवड्यात केंद्र सरकारकडून या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिली जाण्याची शक्यता आहे. अलीकडेच एलआयसीच्या अध्यक्षांची युनियनच्या प्रतिनिधींशी ऑनलाईन चर्चा झाली. यात व्यवस्थापनाने दिलेल्या वेतन वाढीच्या प्रस्तवाची माहिती दिली. 

LIC IPO तून १ लाख कोटी व BPCL मधून ८० हजार कोटींची कमाई; केंद्र सरकारला विश्वास

ऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ नाही

मागील वेळी १७ टक्के वेतन वाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता. याशिवाय गृहकर्जावर १ टक्का कपातीचा प्रस्ताव देण्यात आला होता. यंदा मात्र LIC कर्मचाऱ्यांना १८.५ टक्के ते २० टक्क्यांच्या दरम्यान पगारवाढ मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एलआयसीच्या कर्मचाऱ्यांचा १ ऑगस्ट २०१७ पासून वेतनवाढ झालेली नाही, अशी माहिती मिळाली आहे.

LIC पुन्हा संकटमोचक! सरकारने विक्रीस काढलेल्या रेल्वे कंपनीची खरेदी केली हिस्सेदारी

दरम्यान, केंद्र सरकारच्या निर्गुतंवणूक योजनेंतर्गत LIC मधील हिस्सा विकण्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी यंदाचा अर्थसंकल्प सादर करताना केली होती. आगामी काही काळात LIC चा IPO येणार असल्याचे सांगितले जात आहे. आयपीओतील १० टक्के हिस्सा एलआयसीच्या पॉलिसीधारकांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच या या हिस्सा विक्रीतून किमान एक लाख कोटींचा निधी उभारण्याचे केंद्र सरकारचे उद्दिष्ट्य आहे. 

टॅग्स :एलआयसीकेंद्र सरकारनिर्मला सीतारामन