एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांना मुदत ठेव (एफडी स्कीम) वर चांगले पैसे कमविण्याची संधी देत आहे. LIC फिक्स्ड डिपॉझिट स्कीममध्ये ग्राहकांना ५.९ टक्के दराने व्याज मिळत आहे. जर एखाद्या व्यक्तीनं या योजनेत ५ वर्षांसाठी एक लाख रुपये गुंतवले तर त्याला १,३४,८८५ रुपये मिळू शकतात. म्हणजेच सुमारे ३५ हजारांचा थेट फायदा होऊ शकतो. तुम्ही तीच रक्कम ३ वर्षांसाठी FD मध्ये ठेवल्यास आणि ५.९ टक्के दराने व्याज जोडल्यास तुम्हाला एकूण १,३४,२१६ रुपये मिळू शकतात. ही योजना एक वर्ष ते पाच वर्षांपर्यंत घेता येऊ शकते.
LIC FD योजनेत, १ वर्षासाठी ठेवींवर व्याज सामान्य ठेवीदारासाठी ५.१५% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ५.४% आहे. १ वर्ष ५ महिने ३० दिवसांच्या FD वर सामान्य लोकांना ५.५ टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना ५.७५ टक्के व्याज मिळत आहे. १ वर्ष ११ महिने २८ दिवसांच्या FD वर, सामान्य ठेवीदाराला ५.६५ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ५.९% व्याज मिळते. २ वर्षे ११ महिने २७ दिवसांच्या FD वर, सामान्य दर ५.९% आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.१५% व्याज उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, ४ वर्षे ११ महिने २७ दिवसांच्या कालावधीसाठी सामान्य दर ६ टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ६.२५ टक्के व्याज उपलब्ध आहे.
ग्राहकांना किती व्याज मिळतेLIC हाउसिंग फायनान्स FD किंवा LIC FD चा सामान्य दर ५.१५ ते ६% पर्यंत असतो तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर ५.४ ते ६.२५% पर्यंत निश्चित केला जातो. या योजनेत तुम्ही कमाल २० कोटी रुपये जमा करू शकता. समजा एखाद्या ग्राहकाने ५० हजार रुपये जमा केले तर त्याला ३ वर्षांत ५.९% दराने ५९६५६ रुपये मिळतील. जर तीच रक्कम ५ वर्षांसाठी ६% दराने जमा केली, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला ६७,४४३ रुपये मिळतील.
जर १ लाख रुपये जमा केले तर ३ वर्षात ५.९ टक्के दराने १,१९,३११ रुपये आणि ५ वर्षांच्या एफडीवर ६ टक्के दराने १,३४,८८५ रुपये मिळतील. २ लाख रुपये जमा केल्यास ३ वर्षांत २,३८,६२३ रुपये आणि ५ वर्षांच्या एफडीवर २,६९,७७० रुपये मिळतील. ५ लाख रुपये जमा केल्यावर तुम्हाला ३ वर्षांत ५,९६,५५७ रुपये आणि ५ वर्षांत ६,७४,४२५ रुपये मिळतील. १० लाख रुपयांची एफडी सुरू केल्यास ३ वर्षांत ११,९३,११४ रुपये आणि ५ वर्षांत १३,४८,८५० रुपये मिळतील.