Lokmat Money > बिझनेस न्यूज > नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 06:23 PM2022-12-29T18:23:28+5:302022-12-29T18:24:56+5:30

वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

lic housing finance hikes lending rates by 35 bps cites market conditions check new rate here | नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

नववर्षाआधीच LIC नं दिला मोठा झटका, Home Loan महागलं; कंपनीनं केली मोठी घोषणा!

नवी दिल्ली-

वर्ष संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी असतानाच देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीनं ग्राहकांना मोठा झटका दिला आहे. कारण आता एलआयसी हाऊसिंग फायनान्सकडून गृहकर्ज घेणं ग्राहकांसाठी आणखी महाग झालं आहे. LIC HFL कडून व्याजदरात वाढ करण्याची घोषणा करण्यात आली आहे. या निर्णयानंतर होमलोनच्या EMI मध्ये वाढ होणार आहे. कंपनीकडून व्याजदरात ३५ बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली आहे. 

पीटीआयच्या माहितीनुसार एलआयसी हाउन्सिंग फायनान्सनं मोठा निर्णय घेत ग्राहकांना झटका दिला आहे. कंपनीकडून गृहकर्जाच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. प्राइम लेटिंग रेटमध्ये ३५ बेसिस पॉइंट्सची (35 BPS) वाढ करण्यात आली आहे. फायनान्स कंपनीकडून इंटरेस्टमध्ये वाढ केल्यानंतर होम लोनचा किमान व्याजदर ८.६५ टक्के इतका झाला आहे. नवे दर २६ डिसेंबर २०२२ पासून लागू करण्यात आले आहेत. 

रेपो रेट वाढल्यामुळे निर्णय
भारतीय रिझर्व्ह बँकेनं सलग पाचव्यांदा व्याजदरात वाढ केली. रेपो दरात जसजशी वाढ झाली. तसं देशातील बँका आणि फायनान्स कंपन्यांनीही कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. नुकतंच आरबीआयनं रेपो रेटमध्ये ३५ बेसिस पॉइंटनं वाढ केली होती. त्यानंतर एचडीएफसीपासून अनेक बँकांनी आपल्या कर्जदरात वाढ केली. आता या यादीत एलआयसी हाउन्सिंग फायनान्सचाही समावेश झाला आहे. 

कंपनीच्या सीईओंनी सांगितलं कारण
रिपोर्टनुसार, LIC Housing Finance लिमिटेडचे एमटी आणि सीईओ वाय. विश्वनाथ गौड यांनी कर्जदरात केलेल्या वाढीवर स्पष्टीकरण दिलं आहे. "बाजारातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन आम्हाला कर्जदरात वाढ करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. जागतिक पातळीवर उलथापालथ होऊनही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत आहे", असं विश्वानाथ गौड म्हणाले. तसंच रिअल इस्टेट सेक्टरबाबत बोलायचं झालं तर लोकांमध्ये घर खरेदी करण्याची क्षमता वाढली आहे, असंही ते म्हणाले. 

Web Title: lic housing finance hikes lending rates by 35 bps cites market conditions check new rate here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.