Join us

LIC Dhan Rekha Policy : एलआयसीने आणली जबरदस्त विमा पॉलिसी 'धन रेखा'! जाणून घ्या 'या' मनी बॅक स्कीमबाबत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 6:31 PM

LIC Dhan Rekha Policy : या विमा पॉलिसीचे नाव 'धन रेखा' (LIC Dhan Rekha Policy) आहे. यामध्ये, पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल.

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच  एलआयसी (LIC) वेळोवेळी ग्राहकांसाठी शानदार योजना आणते. एलआयसी ही देशातील अशा विमा कंपन्यांपैकी एक आहे, ज्यामध्ये जोखीम न घेता गुंतवणूक करता येते, म्हणजेच येथे केलेली गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. दरम्यान, ही कंपनी सरकारद्वारे संचालित आहे. आता एलआयसीने एक जबरदस्त पॉलिसी आणली आहे. 

एलआयसीने सांगितले आहे की, या विमा पॉलिसीचे नाव 'धन रेखा' (LIC Dhan Rekha Policy) आहे. यामध्ये, पॉलिसी चालू स्थितीत असल्यास, विमा रकमेचा एक निश्चित भाग नियमित अंतराने सर्व्हायव्हल बेनिफिट म्हणून दिला जाईल. म्हणजेच ही पॉलिसी तुम्हाला जबरदस्त फायदा देणार आहे.

या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे मॅच्योर झाल्यावर पॉलिसीधारकाला आधीच मिळालेली रक्कम वजा न करता संपूर्ण विमा रक्कम दिली जाईल. या योजनेत किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम गुंतविली जाऊ शकते. तर यामध्ये कमाल रकमेवर मर्यादा नाही आहे. यामध्ये गुंतवणुकीसाठी दिलेल्या अटींनुसार ते 90 दिवसांपासून ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलाच्या नावावर घेता येते. त्याचप्रमाणे, कमाल वयोमर्यादा देखील 35 वर्षे ते 55 वर्षे आहे.

3 टर्ममध्ये लाँच झाली पॉलिसी- कंपनीने ही पॉलिसी 3 वेगवेगळ्या टर्मसह आणली आहे.- यामध्ये 20 वर्षे, 30 वर्षे आणि 40 वर्षे या तीन टर्म आहेत.- त्यातून तुम्ही कोणतेही एक टर्म निवडू शकता.- तुम्हाला टर्मनुसार प्रीमियम रक्कम भरावी लागेल.- जर तुम्ही 20 वर्षांची टर्म निवडली तर तुम्हाला 10 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.- तुम्ही 30 वर्षांची टर्म निवडल्यास, तुम्हाला 15 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.- तुम्ही 40 वर्षांची टर्म निवडल्यास, तुम्हाला 20 वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल.- याशिवाय, तुम्ही सिंगल प्रीमियम देखील भरू शकता.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकपैसा