Join us

LIC IPO Update : एलआयसी आयपीओ बाबत मोठी घडामोड; SEBI वर सारे अवलंबून, पॉलिसीधारकांना खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 9:14 PM

LIC IPO Update: भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या आयपीओची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

LIC IPO Update: भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) च्या IPO ची वाट पाहत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा आयपीओ पुढील महिन्यात येण्याची शक्यता आहे. वास्तविक, भारतीय विमा नियामक प्राधिकरण (IRDAI) ने LIC IPO ला मंजुरी दिली आहे. एलआयसीचा आयपीओ पूर्ण करण्यासाठी गेल्या सप्टेंबरमध्ये १० मर्चंट बँकर्सची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये गोल्डमन सॉक्स, सिटीग्रुप आणि नोमुरा यांचा समावेश आहे.

याशिवाय, सिरिल अमरचंद मंगलदास यांची कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. आयपीओपूर्वी सहा स्वतंत्र संचालकांना एलआयसीच्या संचालक मंडळात समाविष्ट करण्यात आले आहे. कॉर्पोरेट गव्हर्नन्सशी संबंधित नियम पूर्ण करण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

सेबीकडे जमा करणार ड्राफ्ट पेपरसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमा कंपनी लवकरच त्यांचा मसुदा रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल करेल अशी अपेक्षा आहे. एलआयसी ११ फेब्रुवारी रोजी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करू शकते. DRHP मधील निर्गुंतवणुकीचे प्रमाण आणि एम्बेडेड व्हॅल्यूचा उल्लेख केला जाईल.

निर्गुंतवणुकीचे लक्ष्य साध्य करण्यात मदतअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२२ च्या अर्थसंकल्पात एलआयसीचा आयपीओ लवकरच येईल असं सांगितलं होतं. एलआयसी आयपीओमध्ये शेअर्सच्या विक्रीतून १ लाख कोटी रुपये उभारण्याची सरकारची योजना आहे. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असू शकतो. सरकारच्या निर्गुंतवणुकीच्या लक्ष्यासाठी एलआयसीचा आयपीओ महत्त्वाचा आहे.

पॉलिसीधारकांना सूटएलआयसीच्या आगामी आयपीओमध्ये, त्यांच्या पॉलिसीधारकांना ५ टक्के सूट मिळण्याची अपेक्षा आहे. यासोबतच रिटेल बिडर्स आणि कर्मचाऱ्यांनाही प्राइस बँडवर काही सूट मिळण्याची अपेक्षा आहे.

टॅग्स :एलआयसीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूकएलआयसी आयपीओ