Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP

LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP

LIC IPO : वाचा याचा काय होणार परिणाम, केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2022 01:19 PM2022-03-21T13:19:09+5:302022-03-21T13:19:28+5:30

LIC IPO : वाचा याचा काय होणार परिणाम, केव्हा येणार एलआयसीचा आयपीओ.

lic ipo updates life insurance corporation files fresh drhp with sebi based on december quarter result know more details | LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP

LIC IPO बाबत मोठी अपडेट; कंपनीनं नव्यानं SEBI कडे जमा केला DRHP

LIC IPO : एलआयसीच्या आयपीओबाबत (LIC IPO) एक मोठी अपडेट समोर आली आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून (Life Insurance Corporation) आयपीओसाठी नव्यानं बाजार नियामक सेबीकडे DRHP जमा करण्यात आला आहे. सीएनबीसीच्या रिपोर्टनुसार एलआयसीनं डिसेंबर तिमाहीच्या निकालांच्या आधारावर नव्यानं डीआरएचपी जमा केला आहे. यापूर्वी कंपनीनं सेबीकडे जमा केलेल्या डीआरएचपीला मंजुरी मिळाली होती आणि त्यानुसार एलआयसी १२ मे पर्यंत आयपीओ आणू शकते. त्यानंतर पुन्हा नव्यानं डीआरएचपी जमा करण्याची गरज भासेल. 

यापूर्वी १३ फेब्रुवारी रोजी एलआयसीच्या आयपीओसाठी डीआरएचपी जमा करण्यात आला होता. सध्या शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार दिसत आहे. अशातच आयपीओला बंपर रिस्पॉन्स मिळावा यासाठी सरकार थोडी वाट पाहण्याची शक्यता आहे. डिसेंबर तिमाहीत लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनच्या कामगिरीकडे पाहिलं तर कंपनीचं नेट प्रॉफिट वाढून २३४.९ कोटी रूपयांवर पोहोचलं आहे. डिसेंबर २०२० मध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट केवळ ९० लाख रुपये होतं. फर्स्ट इयर प्रीमिअम वाढून तो ८७४८.५५ कोटी रुपयांवर पोहोचला आहे, जो डिसेंबर २०२० तिमाहीमध्ये ७९५७.३७ कोटी रुपये होता. रिन्युअल प्रीमिअमही वाढून ५६८२२ कोटी रुपयांवर पोहोचलाय. डिसेंबर तिमाहीत एकूण प्रीमिअम ९७७६१ कोटी रुपये राहीला. एका वर्षापूर्वी तो ९७००८ कोटी रुपये होता.

रिझर्व्ह बँकेनं आयपीओबाबत काय म्हटलं   
एलआयसीच्या आय़पीओबाबत रिझर्व्ह बँकेनंही मोठं वक्तव्य करत हा भारताच्या इतिहासातला सर्वात मोठा आयपीओ असेल असं म्हटलंय. हा आयपीओ योग्य वेळी आणणं गरजेचं आहे. या आयपीओसाठी योग्य वेळ महत्त्वाची आहे. या शिवाय किरकोळ गुंतवणूकदारांसाठी ३५ टक्के आरक्षित ठेवण्यात आले आहे. अशातच रिटेल सेगमेंटचा प्रतिसाद अतिशय आवश्यक आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद आवश्यक
सुरू आर्थिक वर्षात शेअर बाजारात (Stock Market) किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. १ एप्रिल २०२१ ते जानेवारी २०२२ या कालावधीत एकूण २.८९ कोटी डिमॅट खाती उघडण्यात आली. एलआयसीनं आपल्या पॉलिसीधारकांना या आयपीओमध्ये विशेश सुविधा दिली आहे. कंपनीचा सबस्क्रायबर बेस मोठा आहे. अशातच किरकोळ गुंतवणूकदारांचा प्रतिसाद खुप महत्त्वाचा आहे, असं रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय.

Web Title: lic ipo updates life insurance corporation files fresh drhp with sebi based on december quarter result know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.