Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO : सरकारने 12 मे पर्यंत IPO आणला नाही, तर डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2022 03:51 PM2022-04-21T15:51:48+5:302022-04-21T15:52:02+5:30

LIC IPO : सरकारने 12 मे पर्यंत IPO आणला नाही, तर डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील.

LIC IPO: When will the LIC IPO come? The central government is set to take a decision this month | LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO: कधी येणार देशातील सर्वात मोठा IPO? केंद्र सरकार या महिन्यात निर्णय घेण्याच्या तयारीत

LIC IPO : मागील अनेक महिन्यांपासून LIC च्या IPO बाबत उत्सुकता वाढत आहे. LIC मधील 5 टक्के स्टेक किंवा 31.6 कोटी शेअर्सची विक्री मार्चमध्ये होणार होती. मात्र युक्रेनच्या संकटामुळे बाजार कोसळल्यानंतर तारीख पुढे ढकलण्यात आली. पण, आता आयपीओच्या तारखेबाबत सरकार या आठवड्यात निर्णय घेणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. 

IPO आणण्यासाठी 12 मे पर्यंत वेळ
SEBI कडे नवीन कागदपत्रे दाखल न करता लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) चा IPO आणण्यासाठी सरकारकडे 12 मे पर्यंत वेळ आहे.  अधिकाऱ्याने सांगितले की, "आयपीओ कधी आणायचा, याचा निर्णय या आठवड्यात घेतला जाऊ शकतो." विशेष म्हणजे LIC चा IPO हा देशातील सर्वात मोठा IPO असेल. LIC च्या या IPO द्वारे, सरकारने चालू आर्थिक वर्षात 60,000 कोटी रुपयांहून अधिक उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

कागदपत्रे पुन्हा सेबीकडे जमा करावी लागतील
एलआयसीचे मूलभूत मूल्य मिलिमन अॅडव्हायझर्स या आंतरराष्ट्रीय मूल्यांकन कंपनीने तयार केले आहे. 30 सप्टेंबर 2021 रोजी कंपनीचे मूळ मूल्य 5.4 लाख कोटी रुपये होते. विमा कंपनीतील भागधारकांच्या एकात्मिक मूल्याच्या आधारे अंतर्निहित मूल्य प्राप्त केले जाते. जर सरकार 12 मे पर्यंत आयपीओ आणू शकले नाही, तर डिसेंबर तिमाहीचे निकाल सांगून सेबीकडे नवीन कागदपत्रे दाखल करावी लागतील.
 

Web Title: LIC IPO: When will the LIC IPO come? The central government is set to take a decision this month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.