Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO Date: युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती...

LIC IPO Date: युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती...

LIC IPO Date: देशात LIC च्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीकडून पुढील महिन्यात आयपीओ आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 01:17 PM2022-02-22T13:17:22+5:302022-02-22T13:18:05+5:30

LIC IPO Date: देशात LIC च्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीकडून पुढील महिन्यात आयपीओ आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. 

lic ipo will be on hold due to ukraine crisis know what chairman says in press conference | LIC IPO Date: युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती...

LIC IPO Date: युक्रेन संकटामुळे LIC चा IPO थांबवला?, कंपनीच्या चेअरमननं दिली मोठी माहिती...

LIC IPO Date: देशात LIC च्या आयपीओची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. एलआयसीचा आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. कंपनीकडून पुढील महिन्यात आयपीओ आणण्यासाठीचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. 

युक्रेनवरून गेल्या काही दिवसांपासून रशिया आणि अमेरिकेत तणावाचं वातावरण आहे. युक्रेन आणि रशिया युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत आणि याचा परिणाम शेअर बाजारावरही पाहायला मिळतो आहे. शेअर बाजारात अनेक उतार-चढाव पाहायला मिळत आहेत. दुसरीकडे एलआयसी कंपनी आयपीओ आणण्यासाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एलआयसीचे चेअरमन एम.आर.कुमार यांनी एक पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत एलआयसीच्या आयपीओची तारीख जाहीर केली जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. पण तसं काहीच घडलं नाही. कुमार यांनी आयपीओबाबत महत्वाची माहिती यावेळी दिली. 

कंपनीचं सध्याच्या राजकीय घडामोडींवर बारकाईनं लक्ष आहे, असं एलआयसीच्या चेअरमन कुमार यांनी म्हटलं आहे. मार्च महिन्यात कंपनीची आयपीओ येईल अशी आशा सर्वांनाच आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा शेअर बाजारावरही परिणाम होत असल्यानं सध्याच्या रशिया-युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीचा एलआयसीच्या आयपीओवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलआयसीचा आयपीओला आता आणखी उशीर होण्याचीही शक्यता आहे. दरम्यान, एलआयसीनं याआधीच सेबीकडे आयपीओसाठीचा ड्राफ्ट जमा केला आहे. 

भारतातील सर्वात मोठा आयपीओ
एलआयसीचा आयपीओ देशातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे. एलआयसी आपला ५ टक्के समभाग विक्रीस काढणार असून यामाध्यमातून ६३ हजार कोटींचा निधी जमा होण्याची अपेक्षा आहे. शेअर बाजारात लिस्टिंगनंतर एलआयसीचा मार्केट कॅप वास्तवात रिलायन्स इंडस्ट्री आणि टीसीएसला जोरदार टक्कर देईल. 

Web Title: lic ipo will be on hold due to ukraine crisis know what chairman says in press conference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.