Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 05:25 AM2022-04-27T05:25:54+5:302022-04-27T05:26:45+5:30

या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे.

LIC IPO will pay off; It will be open to investors on May 4 | LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

LIC आयपीओ देणार पैसाच पैसा; गुंतवणूकदारांसाठी ४ मे रोजी खुला होणार

नवी दिल्ली : सरकारी मालकीची  विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)चा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ४ मे रोजी खुला होणार आहे. यासाठी प्रति शेअर ९०२ ते ९४९ रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे.  सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.

एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी ६० रुपयांची सवलत दिली आहे, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना ४० रुपयांची सवलत दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. आयपीओसाठी १५ समभागांचा एक लॉट घेता येणार असून, अँकर गुंतवणूक २ मे रोजी समभागांसाठी बोली लावू शकतात. या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे. सरकारला एलआयसी आयपीओच्या माध्यमातून २१ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.

समभागांचे वाटप असे...
एकूण विक्रीचे समभाग : २.२१ कोटी
पॉलिसीधारकांसाठी :    १० टक्के 
कर्मचाऱ्यांसाठी :     १५ लाख 
संस्थात्मक खरेदीदार :    ५० टक्के
किरकोळ गुंतवणूकदार :    ३५ टक्के
गैर-संस्थागत गुंतवणूकदार : १५ टक्के

Web Title: LIC IPO will pay off; It will be open to investors on May 4

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.