नवी दिल्ली : सरकारी मालकीची विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी)चा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी अनेक महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर ४ मे रोजी खुला होणार आहे. यासाठी प्रति शेअर ९०२ ते ९४९ रुपये प्राइस बँड निश्चित केली आहे. सूत्रांनी मंगळवारी ही माहिती दिली.
एलआयसीने आपल्या पॉलिसीधारकांसाठी ६० रुपयांची सवलत दिली आहे, तर किरकोळ गुंतवणूकदार आणि कर्मचाऱ्यांना ४० रुपयांची सवलत दिली आहे, असे सूत्रांनी सांगितले. आयपीओसाठी १५ समभागांचा एक लॉट घेता येणार असून, अँकर गुंतवणूक २ मे रोजी समभागांसाठी बोली लावू शकतात. या आयपीओच्या माध्यमातून सरकार कंपनीमधील आपली ३.५ टक्के हिस्सेदारी अथवा २२.१३ कोटी शेअर्स विकणार आहे. सरकारला एलआयसी आयपीओच्या माध्यमातून २१ हजार कोटी रुपये मिळणार आहेत.
समभागांचे वाटप असे...एकूण विक्रीचे समभाग : २.२१ कोटीपॉलिसीधारकांसाठी : १० टक्के कर्मचाऱ्यांसाठी : १५ लाख संस्थात्मक खरेदीदार : ५० टक्केकिरकोळ गुंतवणूकदार : ३५ टक्केगैर-संस्थागत गुंतवणूकदार : १५ टक्के