जर आपली एकगठ्ठा 25 लाख रुपये मिळवण्याचे इच्छा असेल तर आपल्याला एलआयसीच्या सर्वोत्तम पॉलिसीमध्ये गुंतवणूक करायला हवी. या पॉलिसीला आम्ही एवढ्यासाठीच सर्वोत्तम पॉलिसी म्हणत आहोत, कारण यासाठी आपल्याला केवळ 45 रुपयांचीच बचत करायची आहे. होय, जर या पॉलिसीत आपण रोज 45 रुपये देखील जमा केले, तर या योजनेतून आपल्याला लवकरच 25 लाख रुपयांचा परतावा मिळू शकेल. या पॉलिसीचे नाव आहे LIC जीवन आनंद. आजच्या काळात 45 रुपये वाचविणे अत्यंत सोपे आहे. जर आपण आवांतर खर्च वाचवला आणि LIC चा प्रीमियम भरला तर, आपण हा प्रिमियम भरत आहात याची आपल्याला जाणिवही होणार नाही.
कसा मिळेल फायदा -
या योजनेत गुंतवणूक करण्याची आपली इच्छा असेल तर, आपल्याकडे काही सरकारी कागदपत्रे असणेही आवश्यक आहे. जर आपल्याकडे आधार कार्ड आणि बँक अकाउंट असेल तर आपण या योजनेसाठी अगदी सहजपणे अप्लाई करू शकता. या पॉलिसीत गुंतवणूककरणे अत्यंत सोपे आहे. यामुळे या योजनेत रस्त्याच्या कडेला उद्योग करणारे, मजूर आणि रिक्शा चालकही गुंतवणूक करत आहेत.
या योजनेत आपल्याला मॅच्युरिटीचाही लाभ मिळतो. जर पॉलिसी सुरू असेल आणि त्याच वेळी पॉलिसी होल्डर (Policy Holder)ची डेथ झाली, तर नॉमिनीला 125 टक्क्यांचा परतावा मिळतो. यालाच डेथ बेनिफिट (Death Benefits) म्हणूनही ओळखले जाते. याशिवाय या पॉलिसीत आपल्याला बोनसचाही फायदा मिळतो. LIC च्या या प्लॅनमध्ये एक लाख रुपयांची सम एश्योर्ड अमाउंट राहते.
असे जमा करा 45 रुपये -
या योजनेच्या माध्यमाने आपल्याला 25 लाख रुपये मिळवायचे असतील, तर आपल्याला रोजच्या रोज 45 रुपयांची बचत करावी लागेल. अशा प्रकारे महिन्याचे 1358 रुपयांची बचत होते. अशा प्रकारे आपल्या 35 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. प्लॅननुसार आपण दर वर्षी 16,300 रुपयांची गुंतवणूक कराल. अशा प्रकारे 35 वर्षांपर्यंत आपण ही गुंतवणूक करत राहाल. यानंतर आपल्याकडे तब्बल 25 लाख रुपयांचा फंड तयार होईल.