Join us

एलआयसीची सुपरहिट स्कीम! 233 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर मिळतील 17 लाख, करातही सूट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 7:34 PM

एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा केवळ 233 रुपये जमा करून 17 लाखांचा मोठा निधी मिळवू शकता. 

नवी दिल्ली : एलआयसी (LIC) आपल्या ग्राहकांसाठी वेळोवेळी शानदार योजना आणत असते. एलआयसी प्रत्येक श्रेणीतील लोकांसाठी योजना तयार करते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसह लखपती व्हायचे असेल, तर एलआयसीची पॉलिसी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. एलआयसी जीवन लाभ पॉलिसी ही अशीच एक योजना आहे, ज्यामध्ये तुम्ही दरमहा केवळ 233 रुपये जमा करून 17 लाखांचा मोठा निधी मिळवू शकता. 

एलआयसी जीवन लाभजीवन लाभ  (LIC jeevan Labh, 936) नावाची ही नॉन-लिंक्ड पॉलिसी आहे. यामुळे या पॉलिसीचा शेअर बाजाराशी काहीही संबंध नाही. बाजार वर गेला किंवा खाली, त्याचा तुमच्या पैशांवर अजिबात परिणाम होणार नाही. म्हणजेच या योजनेत तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित आहेत. ही एक मर्यादित प्रीमियम योजना (Limited Premium Plan) आहे. मुलांचे लग्न, शिक्षण आणि मालमत्तेची खरेदी लक्षात घेऊन ही योजना करण्यात आली आहे.

पॉलिसीची खासियत -LIC ची जीवन लाभ (LIC Jeevan Labh Plan feature) पॉलिसी नफा आणि संरक्षण दोन्ही देते.- 8 ते 59 वयोगटातील लोक ही पॉलिसी सहज घेऊ शकतात.- पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांपर्यंत घेतली जाऊ शकते.- किमान 2 लाख रुपयांची विमा रक्कम घ्यावी लागेल.- यामध्ये कमाल मर्यादा नाही.- 3 वर्षांसाठी प्रीमियम भरल्यावर कर्जाची सुविधाही उपलब्ध आहे.- प्रीमियमवर कर सूट आणि पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, नॉमिनीला विमा रक्कम आणि बोनसचे फायदे मिळतात.

नॉमिनीला मिळेल डेथ बेनिफिटजर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसीच्या मुदतीदरम्यान झाला आणि त्याने मृत्यूपर्यंत सर्व प्रीमियम भरले, तर त्याच्या नॉमिनीला मृ्त्यू लाभ म्हणून मृत्यूनंतर मिळणारी रक्कम, सिंपल रिव्हर्शनरी बोनस आणि फायनल एडिशन बोनस मिळतो. म्हणजेच, नॉमिनीला अतिरिक्त विम्याची रक्कम मिळेल.

टॅग्स :एलआयसीपैसा