Join us  

LIC च्या 'या' योजनेत दररोज 200 रुपये गुंतवणूक केल्यास अशा प्रकारे मिळतील 28 लाख 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 4:49 PM

LIC Jeevan Pragati Bima Yojana : दररोज 200 रुपये जमा करून, तुम्ही मॅच्युरिटीवर 28 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता.

नवी दिल्ली : जर तुम्हाला गुंतवणुकीत रस असेल, तर तुम्ही एलआयसीच्या या विमा योजनेत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. कारण लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (Life Insurance Corporation) ही देशातील सर्वात मोठी सरकारी विमा कंपनी प्रत्येक वर्गातील लोकांसाठी विमा योजना (Insurance Scheme) देते.

यामध्ये सुरक्षेसोबतच गुंतवणुकीचा पर्यायही मिळत आहे आणि मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर चांगली रक्कम दिली जाते. भारतीय आयुर्विमा महामंडळाची जीवन प्रगती विमा योजना (LIC Jeevan Pragati Bima Yojana)  तुम्हाला काही वर्षांत करोडपती बनवू शकते. यामध्ये, दररोज 200 रुपये जमा करून, तुम्ही मॅच्युरिटीवर 28 लाख रुपयांपर्यंतची रक्कम जमा करू शकता.

जर तुम्ही एलआयसीमध्येगुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही जीवन प्रगती विमा योजना खरेदी करू शकता. एलआयसीच्या जीवन प्रगती विमा योजनेत गुंतवणूक करून लोकांना आजीवन संरक्षण दिले जाते. तसेच, दररोज 200 रुपये गुंतवल्यास या योजनेअंतर्गत एका महिन्यात 6,000 रुपये जमा होतील. म्हणजे वर्षाला 72 हजार रुपये जमा होतील. त्यानंतर 20 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला या योजनेत बोनससह 28 लाख रुपये मिळतील.

या विमा योजनेत दर पाच वर्षांनी जोखीम संरक्षण वाढतच जाते. याचा अर्थ दर पाच वर्षांनी विम्याची रक्कम वाढेल. डेथ बेनिफिटबद्दल बोलताना, पॉलिसी धारकाच्या मृत्यूनंतर, बोनस आणि विमा रक्कम त्याच्या कुटुंबाला किंवा नॉमिनीला दिली जाते.

योजनेचे काय आहेत नियम?- एलआयसीच्या जीवन प्रगती विमा योजनेअंतर्गत किमान मुदत 12 ​​आणि 20 वर्षे आहे.- 12 ते 45 वर्षे वयोगटातील लोक ही विमा योजना खरेदी करू शकतात.- या योजनेअंतर्गत, प्रीमियमची रक्कम तिमाही, सहामाही आणि वार्षिक आधारावर जमा केली जाऊ शकते.- किमान विमा रक्कम 1.5 लाख आणि कमाल मर्यादा नाही.

असे मिळेल विमा कव्हरेजजर कोणी या योजनेत 4 लाख रुपयांची विमा पॉलिसी घेतली असेल तर पाच वर्षांनी ती 5 लाख रुपये होईल. त्यानंतर 10 ते 15 वर्षांसाठी 6 लाख रुपये आणि 20 वर्षांत ही रक्कम 7 लाख रुपये होईल.  त्यामुळे, जितक्या लवकर तुम्ही या योजनेचा लाभ घ्याल, तितके चांगले परतावे मिळतील.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूक