Join us

रिटायरमेंटनंतर पैशांचं टेन्शन नाही; दर महिन्याला LIC ची विशेष पॉलिसी तुम्हाला देणार ९ हजार पेन्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2021 8:50 PM

LIC Spacial Policy : एलआयसीच्या विशेष पॉलिसीद्वारे तुम्हाला मिळू शकतात दरमहा ९ हजार रूपये. खरेदी करण्यासाठी ग्राहकांचं वय ३० वर्षांपेक्षा जास्त असणं अनिवार्य आहे.

ठळक मुद्देया स्कीमचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचं वय ३० ते ८५ वर्षांदरम्यान असणं आवश्यक आहे.

अनेक जण आपलं रिटायरमेंट नंतर काय हा सातत्यानं विचार करत असतं. परंतु एका प्लॅननं तुमची रिटायरमेंटनंतरचं टेन्शन जाऊ शकतं. आम्ही एलआयसीच्या अशा एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत ज्याच्या मदतीनं तुम्हाला महिन्याला जवळपास ९ हजार रूपये मिळू सकतात. ही पॉलिसी खरेदी करण्यासाठी तुमचं किमान वय ३० वर्षे आणि कमाल ८५ वर्षांपेक्षा कमी असणं अनिवार्य आहे. या LIC च्या पॉलिसीचं नाव आहे जीवन शांती पॉलिसी (Jeevan Shanti Scheme).

काय आहेत फायदे?

  • एलआयसीच्या या स्कीममध्ये ग्राहकांना डेथ बेनिफिट देण्यात येतं. याद्वारे गुंतवणूकदार मृत्यूनंतर त्यांचे कुटुंबीय किंवा नॉमिनीला पेन्शनसोबत अन्य लाभ देण्यात येतात.
  • या योजनेमध्ये तुम्हाला २ पर्याय मिळतील. पहिला इमिडिएट एन्युटी आणि दुसरा डिफर्ड एन्युटी. एमिडिएट एन्युटीमध्ये गुंतवणूकदारांना त्वरित परतावा मइळतो. तर दुसरीकडे डिफर्ड एन्युटीमध्ये तुम्हाला सिंगल प्रीमिअम देऊन योजनेत गुंतवणूक केल्यात ठराविक कालावधीनंतर परतावा मिळतो.
  • एलआयसीच्या या स्कीममध्ये किमान दीड लाख रूपयांची गुंतवणूक करणं आवश्यक आहे. यामध्ये कमाल गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही त्वरित किंवा १ ते २० वर्षांदरम्यान केव्हाही पेन्शन मिळवू शकता. 
  • जॉईंट लाईफ ऑप्शनमध्ये तुम्ही कोणत्याही क्लोझ रिलेटिव्हला सामील करू शकता. १० लाखांच्या गुंतवणूकीनंतर जर तुम्ही ५ वर्षांनंतर पेन्शन सुरू केलं तर ९.१८ टक्क्यांच्या रिटर्नच्या हिशोबाने वार्षिक पेन्शन देण्यात येतं.  

किती मिळतं पेन्शन?एलआयसीच्या या विमा पॉलिसीमध्ये वयाच्या ४५ व्या वर्षी १० लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला वार्षिक ७४,३०० रुपये पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. जर तुम्हाला ही रक्कम मासिक घ्यायची असेल तर ती सुमारे ९ हजार रुपये होईल. जर तुम्ही ५, १०, १५ किंवा २० वर्षांनंतर पेन्शन सुरू केले तर काही अटी असल्या तरी त्याची रक्कम वाढेल. आपण मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक आधारावर परतावा मिळवू शकता. या स्कीममध्ये तुम्ही ऑफलाईन सह ऑनलाइनही गुंतवणूक करू शकता. एलआयसी जीवन शांती एक व्यापक वार्षिक योजना असून यामध्ये व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांनाही लाभ देण्यात येतो.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकनिवृत्ती वेतनभारत