Join us

LIC ची कमाल योजना! केवळ ४ वर्ष प्रीमियम भरा अन् १ कोटी मिळवा; जाणून घ्या, पॉलिसी डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 12:03 PM

तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एलआयसी हा एक चांगला पर्याय आहे. 

नवी दिल्ली: सुरक्षित गुंतवणूक म्हणून LIC कडे पाहिले जाते. आताच्या घडीला देशभरात अनेक पॉलिसी कंपनी आहेत. मात्र, सर्वाधिक विश्वास भारतीय आयुर्विमा महामंडळावर असल्याचे पाहायला मिळत आहे. एलआयसी नवनवीन पॉलिसी सादर करत असते. तसेच अनेक फायदेशीर योजना आणते. ज्यामध्ये गुंतवणूक करून चांगला नफा मिळू शकतो. एवढेच नाही, तर या योजनांमधील गुंतवणुकीवर करात सूटही आहे. जर तुम्ही सुरक्षित गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल, तर तुमच्यासाठी एलआयसी हा एक चांगला पर्याय आहे. 

LIC जीवन शिरोमणी योजना ही अशी बचत गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये मोठा नफा मिळू शकतो. एलआयसी जीवन शिरोमणी योजना १९ डिसेंबर २०१७ रोजी लाँच करण्यात आली. ही एक नॉन-लिंक केलेली, मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बँक योजना आहे. एलआयसी जीवन शिरोमणी योजना ही अशी बचत गुंतवणूक योजना आहे, ज्यामध्ये मोठा नफा मिळू शकतो.

पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित कर्ज

LIC ची ही पॉलिसी पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला योजनेदरम्यान मृत्यू झाल्यास लाभाच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य देखील प्रदान करते. तसेच पॉलिसीधारक जिवंत असेल, तर निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा दिली जाते. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते. या पॉलिसी मुदतीदरम्यान ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्यावर आधारित कर्ज घेऊ शकतो.

१ कोटी रुपये विमा रकमेची हमी

जर तुम्ही १४ वर्षांसाठी पॉलिसी घेतली, तर तुम्हाला एकूण एक कोटीपर्यंत परतावा मिळेल. या योजनेत गंभीर आजारांसाठी विमा संरक्षण देखील दिले जाते. ही बाजाराशी संबंधित नफा योजना आहे. LIC च्या नॉन-लिंक्ड प्लॅनमध्ये तुम्हाला किमान १ कोटी रुपये विमा रकमेची हमी मिळते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा १ कोटी रुपये दिला जातो.

जाणून घ्या काही महत्त्वाचे मुद्दे

- पॉलिसी टर्म : १४, १६, १८ आणि २० वर्षे- कमाल विमा रक्कम : कोणतीही मर्यादा नाही- प्रीमियम किती वर्ष भरावा लागेल : ४ वर्षे- किमान विमा रक्कम - १ कोटी रुपये- प्रवेशासाठी किमान वय : १८ वर्षे- प्रवेशासाठी कमाल वय : १४ वर्षांच्या पॉलिसीसाठी ५५ वर्षे; १६ वर्षांच्या पॉलिसीसाठी ५१ वर्षे; १८ वर्षांच्या पॉलिसीसाठी ४८ वर्षे; २० वर्षांच्या पॉलिसीसाठी ४५ वर्षे. 

टॅग्स :एलआयसी