Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC jeevan shiromani Plan: LIC चा सुपरहिट प्लॅन! फक्त 4 वर्षे प्रीमियम भरुन मिळवा 1 कोटींचा फायदा, पाहा डिटेल्स

LIC jeevan shiromani Plan: LIC चा सुपरहिट प्लॅन! फक्त 4 वर्षे प्रीमियम भरुन मिळवा 1 कोटींचा फायदा, पाहा डिटेल्स

LIC jeevan shiromani Plan: पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान ग्राहकाला पॉलिसीवर कर्जदेखील मिळेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2022 04:26 PM2022-02-02T16:26:41+5:302022-02-02T16:26:48+5:30

LIC jeevan shiromani Plan: पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान ग्राहकाला पॉलिसीवर कर्जदेखील मिळेल.

LIC jeevan shiromani Plan: LIC's superhit plan! Just pay 4 years premium and get a profit of 1 crore, see details | LIC jeevan shiromani Plan: LIC चा सुपरहिट प्लॅन! फक्त 4 वर्षे प्रीमियम भरुन मिळवा 1 कोटींचा फायदा, पाहा डिटेल्स

LIC jeevan shiromani Plan: LIC चा सुपरहिट प्लॅन! फक्त 4 वर्षे प्रीमियम भरुन मिळवा 1 कोटींचा फायदा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. काही पर्यायांमध्ये रिस्क आहे तर काहींमध्ये नाही. अशात परंतु तुम्हाला सुरक्षित गुंतवणूक करायची असेल आणि नफाही मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी LIC ची जीवन शिरोमणी योजना (LIC jeevan shiromani Plan) हा एक चांगला पर्याय आहे. 

एक कोटी रुपयांची हमी 
LIC ची जीवन शिरोमणी योजना ही एक नॉन-लिंक्ड योजना आहे. यामध्ये तुम्हाला किमान 1 कोटी रकमेची हमी मिळते. LIC आपल्या ग्राहकांना त्यांचे जीवन सुरक्षित करण्यासाठी अनेक चांगल्या पॉलिसी देत ​​असते. या पॉलिसीमध्ये किमान परतावा 1 कोटी रुपये आहे. म्हणजेच, जर तुम्ही 14 वर्षांसाठी एक रुपयाच्या दराने पैसे जमा केले तर तुम्हाला एकूण एक कोटीपर्यंत परतावा मिळेल.

काय आहे योजना ?

LIC ची जीवन शिरोमणी (टेबल क्र. 847) योजना 19 डिसेंबर 2017 रोजी सुरू करण्यात होती. ही एक नॉन-लिंक्ड मर्यादित प्रीमियम पेमेंट मनी बॅक योजना आहे. ही योजना खास HNI (हाय नेट वर्थ व्यक्ती) साठी बनलेली आहे. ही योजना गंभीर आजारांसाठी देखील संरक्षण प्रदान करते. यामध्ये 3 ऑप्शनल उपलब्ध आहेत.

आर्थिक सहाय्य मिळवा

जीवन शिरोमणी योजना पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला पॉलिसी मुदतीदरम्यान मृत्यू लाभाच्या रूपात आर्थिक सहाय्य प्रदान करते. या पॉलिसीमध्ये पॉलिसीधारक जिवंत राहिल्यास निश्चित कालावधीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कमही दिली जाते.

  • 14 वर्षांची पॉलिसी -10व्या आणि 12व्या वर्षी सम एशॉर्ड 30-30%
  • 16 वर्षांची पॉलिसी -12व्या आणि 14व्या वर्षी सम एशॉर्ड 35-35%
  • 18 वर्षांची पॉलिसी - 14व्या आणि 16व्या वर्षी सम एशॉर्ड 40-40%
  • 20 वर्षांची पॉलिसी -16व्या आणि 18व्या वर्षी सम एशॉर्ड 45-45%.

 

पॉलिसीवर कर्ज
या पॉलिसीचे वैशिष्ट्य म्हणजे पॉलिसीच्या मुदतीदरम्यान, ग्राहक पॉलिसीच्या सरेंडर मूल्याच्या आधारे कर्ज घेऊ शकतो. पण हे कर्ज फक्त एलआयसीच्या अटी आणि शर्तींवरच मिळेल. पॉलिसी कर्ज वेळोवेळी ठरवल्या जाणार्‍या व्याजदरावर उपलब्ध असेल.

नियम आणि अटी

  •  किमान विमा रक्कम – रु 1 कोटी
  •  कमाल विमा रक्कम: कोणतीही मर्यादा नाही (मूलभूत विमा रक्कम 5 लाखांच्या पटीत असेल.)
  •  पॉलिसी टर्म: 14, 16, 18 आणि 20 वर्षे
  •  कधीपर्यंत प्रीमियम भरावा लागेल : 4 वर्षे
  •  किमान वय: 18 वर्षे
  •  कमाल वय: 14 वर्षांच्या पॉलिसीसाठी 55 वर्षे; 16 वर्षांच्या पॉलिसीसाठी 51 वर्षे; 18 वर्षांच्या पॉलिसीसाठी 48 वर्षे; 20 वर्षांच्या पॉलिसीसाठी 45 वर्षे.

Web Title: LIC jeevan shiromani Plan: LIC's superhit plan! Just pay 4 years premium and get a profit of 1 crore, see details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.