नवी दिल्ली : उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्व पैशांची बचत करत असतो. तसेच, काही लोक चांगला परतावा मिळवण्यासाठी स्टॉक, म्युच्युअल फंड, क्रिप्टो इत्यादींमध्ये गुंतवणूक करतात. दुसरीकडे, भारतातील सर्वाधिक मोठी लोकसंख्या मध्यमवर्गीय आहे, जी या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करणे टाळते. (LIC Jeevan Umang Policy After Investing 1302 Rupees You Can Earn 28 Lacs Of Rupees)
मध्यमवर्गीय लोक मुख्यतः गुंतवणुकीसाठी असे पर्याय शोधतात, ज्यात जोखीम कमी असते. अशा लोकांसाठी एलआयसीची (LIC) एक खास योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक केल्यास भविष्य सुरक्षित होण्याची शक्यता आहे.
या योजनेचे नाव एलआयसी जीवन उमंग योजना (LIC Jeevan Umang Policy) आहे. या खास योजनेमध्ये तुम्ही 1302 रुपये गुंतवून 28 लाखांपर्यंत परतावा मिळवू शकता. एलआयसीची ही योजना खरेदी केल्यानंतर तुम्हाला अनेक फायदे मिळतील.
एलआयसी जीवन उमंग योजनेअंतर्गत तुम्ही यामध्ये 15, 20, 25 किंवा 30 वर्षे गुंतवणूक करू शकता. योजनेअंतर्गत, एखाद्या व्यक्तीचा अपघात किंवा मृत्यू झाल्यास, या योजनेचा त्याला फायदा होईल. या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला आयकरातूनही सूट मिळेल.
ही संपूर्ण जीवन विमा योजना आहे. तुम्ही ती 100 वर्षे घेऊ शकता. ज्यांना योजनेसोबत पेन्शन घ्यायची आहे आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी मोठी रक्कम द्यायची आहे, त्यांच्यासाठी ही योजना एक चांगला पर्याय आहे.
जर तुम्ही एलआयसीची ही योजना 1302 रुपये दरमहा प्रीमियमवर 100 वर्षांसाठी घेतली तर तुमची रक्कम 28 लाख रुपये होईल. तुमच्या मृत्यूनंतर ही रक्कम तुमच्या कुटुंबाला दिली जाईल. ही लिमिटेड पेमेंट प्रीमियम योजना आहे.