मुलांचा जन्म झाला की आई-वडिलांवरील जबाबदारी वाढते. त्यांचे संगोपन, शिक्षण, लग्न असे अनेक खर्च असतात. यासाठी पैसा जोडावा लागतो. आम्ही तुम्हाला आज एका अशा पॉलिसीबाबत (Investment Policy) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षण आणि लग्नासाठी मोठी तरतूद करू शकता. (What is the LIC kanyadan policy? The Life Insurance Corporation (LIC) has designed a policy dedicated for daughters. )
भारतीय जीवन विमा निगम (LIC) ने ही योजना मुलींसाठी आणली आहे. याने नाव आहे एलआयसी कन्यादान पॉलिसी (LIC Kanyadaan policy). एलआयसी कन्यादान पॉलिसीमध्ये रोज 130 रुपये म्हणजेच वर्षाचे 47,450 रुपये आणि महिन्याचे 4000 रुपये गुंतविले तर 25 वर्षांनी एलआयसी 27 लाख रुपये देणार आहे. LIC Kanyadaan policy मध्ये गुंतविण्यासाठी कमीतकमी वय 30 वर्षे आणि मुलीचे वय कमीतकमी 1 वर्ष असावे.
या पॉलिसीनुसार मिनिमम मॅच्युरिटी पीरिएड 13 वर्षांचा आहे. जर कोणत्याही कारणाने विमाधारक व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलीला एलआयसीकडून 5 लाख रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. जर एखाद्या व्यक्तीने या योजनेतून 5 लाख रुपयांचा विमा घेतला तर 1,951 रुपये द्यावे लागणार आहेत. मुदत संपल्यानंतर एलआयसीकडून 13.37 लाख रुपये मिळतील.
अशाप्रकारे जर एखाद्या व्यक्तीने 10 लाखांचा विमा घेतला तर त्याला महिन्याचे 3901 रुपये भरावे लागणार आहेत. 25 वर्षांनी एलआयसीकडून 26.75 लाख रुपये मिळतील.
आयकरातून मिळमार सूट....आयकर कायदा 1961 च्या 80C नुसार विमाधारकाला यावर सूट मिळणार आहे. करामध्ये ही सूट 1.50 लाख रुपयांपर्यंत आहे. या योजनेत विमा घेण्यासाठी आधार कार्ड, इन्कम प्रूफ, ओळख पत्र, जन्म प्रमाणपत्र आदी महत्वाचे कागदपत्र लागणार आहेत.