Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ची कमाल योजना! फक्त १३० रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी २७ लाख मिळवा

LIC ची कमाल योजना! फक्त १३० रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी २७ लाख मिळवा

देशवासीयांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळासोबत चालणाऱ्या पॉलिसी लॉंच करत असते. जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 10:39 PM2022-02-10T22:39:39+5:302022-02-10T22:40:30+5:30

देशवासीयांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळासोबत चालणाऱ्या पॉलिसी लॉंच करत असते. जाणून घ्या...

lic kanyadan policy invest only 130 rs daily and you can get 27 lac on the date of maturity | LIC ची कमाल योजना! फक्त १३० रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी २७ लाख मिळवा

LIC ची कमाल योजना! फक्त १३० रुपये गुंतवा आणि मॅच्युरिटीवेळी २७ लाख मिळवा

नवी दिल्ली: गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC देशवासीयांची सर्वांत विश्वासार्ह कंपनी आहे. LIC च्या अनेकविध योजना ग्राहकांच्या पसंतीस पडत असून, कोट्यवधी ग्राहक याचा लाभ घेताना पाहायला मिळत आहे. यातच एलआयसीने एक कमाल योजना आणली असून, दररोज १३० रुपये गुंतवल्यास प्रत्यक्ष पॉलिसी मिळताना २७ लाख रुपयांपर्यंतचा परतावा मिळू शकेल. 

देशवासीयांच्या गरजा लक्षात घेऊन आधुनिक काळासोबत चालणाऱ्या पॉलिसी लॉंच करत असते. अशीच एक पॉलिसी एलआयसीने मुलींसाठी सुरू केली, तिचे नाव आहे कन्यादान पॉलिसी. LIC ची कन्यादान पॉलिसी घेण्यासाठी अर्जदाराकडे आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, ओळखपत्र, मुलीचा जन्म दाखला यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांच्या आधारे, अर्जदाराला एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीचा लाभ मिळू शकतो. 

वार्षिक प्रीमियम किती भरावा लागेल?

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये दररोज १३० रुपये या दराने गुंतवणूक केली, तर ती वार्षिक ४७,४५० रुपये होईल. या पॉलिसीमध्ये, गुंतवणूकदाराला मुदतपूर्तीपूर्वी तीन वर्षांसाठी प्रीमियम भरावा लागेल. त्यानंतर पॉलिसीमध्ये एक रुपयाही गुंतवण्याची गरज नाही. २५ वर्षांनंतर कन्यादान पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर २७ लाख रुपयांपर्यंतची रक्कम मिळू शकते, असे सांगितले जाते. 

या पॉलिसीचे फायदे काय?

एलआयसीच्या कन्यादान पॉलिसीमध्ये कोणत्याही कारणामुळे वडिलांचा किंवा पालकाचा अपघाती मृत्यू झाल्यास एलआयसीकडून एकरकमी १० लाख रुपये दिले जाऊ शकतात. याशिवाय पॉलिसीच्या प्रीमियममध्येही सूट देण्यात येते. जर नैसर्गिक मृत्यू झाला असेल, तर एकरकमी ५ लाख रुपये आणि ५०,००० रुपये दरवर्षी दिले जातात. या पॉलिसीमधील आयकर कलम ८०सी अंतर्गत, एक लाख ५० हजार रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे.
 

Web Title: lic kanyadan policy invest only 130 rs daily and you can get 27 lac on the date of maturity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.