Lokmat Money > बिझनेस न्यूज > एलआयसी सर्वात मोठी ‘पीएसयू’ , बाजारातील भांडवली मूल्य आता एसबीआयपेक्षाही अधिक

एलआयसी सर्वात मोठी ‘पीएसयू’ , बाजारातील भांडवली मूल्य आता एसबीआयपेक्षाही अधिक

विशेष म्हणजे, बाजार आपटलेला असतानाही एलआयसीचा समभाग तेजीत आला. सकाळच्या सत्रात तो ९१९.४५ रुपयांवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2024 01:02 PM2024-01-18T13:02:19+5:302024-01-18T13:02:43+5:30

विशेष म्हणजे, बाजार आपटलेला असतानाही एलआयसीचा समभाग तेजीत आला. सकाळच्या सत्रात तो ९१९.४५ रुपयांवर होता.

LIC largest 'PSU', market capitalization now more than SBI | एलआयसी सर्वात मोठी ‘पीएसयू’ , बाजारातील भांडवली मूल्य आता एसबीआयपेक्षाही अधिक

एलआयसी सर्वात मोठी ‘पीएसयू’ , बाजारातील भांडवली मूल्य आता एसबीआयपेक्षाही अधिक

नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभागांत बुधवारी सकाळी सुमारे २ टक्क्यांची जबरदस्त तेजी आली. त्याबरोबर भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) मागे टाकून एलआयसी आता देशातील सर्वांत मोठी सूचीबद्ध (लिस्टेड) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली. 

विशेष म्हणजे, बाजार आपटलेला असतानाही एलआयसीचा समभाग तेजीत आला. सकाळच्या सत्रात तो ९१९.४५ रुपयांवर होता. एलआयसीच्या समभागांचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक ठरला. काही दिवसांपासून एलआयसीचे समभाग तेजीत आहेत. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल ५.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एसबीआयपेक्षाही ते  जास्त आहे. 

१७,४६९ कोटींचा नफा
एसबीआयच्या समभागात १.१८ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे बँकेचे बाजार भांडवल घटून ५.६१ लाख कोटी रुपयांवर आले. आता एलआयसीचा समभाग आपल्या आयपीओच्या किमतीपेक्षा ४ टक्के कमी आहे. वित्त वर्ष २०२४च्या पहिल्या सहामाहीत एलआयसीने १७,४६९ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे.

नोव्हेंबरपासून तेजीत
एलआयसीच्या समभागात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तेजी पाहायला मिळत आहे. तेव्हापासून एलआयसीचा समभाग ५० टक्के वाढल्याचे दिससे आहे. 
सूचीबद्धतेनंतर मार्च २०२३ मध्ये एलआयसीचा समभाग घसरून ५३० रुपयांवर आला होता. हा आजवरचा सार्वकालिक नीचांक होता. 
नोव्हेंबरमध्ये एलआयसीचा समभाग १२.८३ टक्के, तर डिसेंबरमध्ये २२.६६ टक्के वाढला होता. जानेवारी २०२४ मध्ये तो आतापर्यंत १० टक्के वाढला आहे.

Web Title: LIC largest 'PSU', market capitalization now more than SBI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.