नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) समभागांत बुधवारी सकाळी सुमारे २ टक्क्यांची जबरदस्त तेजी आली. त्याबरोबर भारतीय स्टेट बँकेला (एसबीआय) मागे टाकून एलआयसी आता देशातील सर्वांत मोठी सूचीबद्ध (लिस्टेड) सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी बनली.
विशेष म्हणजे, बाजार आपटलेला असतानाही एलआयसीचा समभाग तेजीत आला. सकाळच्या सत्रात तो ९१९.४५ रुपयांवर होता. एलआयसीच्या समभागांचा हा ५२ आठवड्यांचा उच्चांक ठरला. काही दिवसांपासून एलआयसीचे समभाग तेजीत आहेत. त्यामुळे कंपनीचे बाजार भांडवल ५.८ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. एसबीआयपेक्षाही ते जास्त आहे.
१७,४६९ कोटींचा नफाएसबीआयच्या समभागात १.१८ टक्के घसरण झाली आहे. त्यामुळे बँकेचे बाजार भांडवल घटून ५.६१ लाख कोटी रुपयांवर आले. आता एलआयसीचा समभाग आपल्या आयपीओच्या किमतीपेक्षा ४ टक्के कमी आहे. वित्त वर्ष २०२४च्या पहिल्या सहामाहीत एलआयसीने १७,४६९ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे.
नोव्हेंबरपासून तेजीतएलआयसीच्या समभागात गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून तेजी पाहायला मिळत आहे. तेव्हापासून एलआयसीचा समभाग ५० टक्के वाढल्याचे दिससे आहे. सूचीबद्धतेनंतर मार्च २०२३ मध्ये एलआयसीचा समभाग घसरून ५३० रुपयांवर आला होता. हा आजवरचा सार्वकालिक नीचांक होता. नोव्हेंबरमध्ये एलआयसीचा समभाग १२.८३ टक्के, तर डिसेंबरमध्ये २२.६६ टक्के वाढला होता. जानेवारी २०२४ मध्ये तो आतापर्यंत १० टक्के वाढला आहे.