Lokmat Money > बिझनेस न्यूज > ‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 07:04 AM2022-06-15T07:04:39+5:302022-06-15T07:04:54+5:30

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे.

LIC launches dhan sanchay scheme get the benefit of guaranteed income | ‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

‘LIC’ ने सुरू केली धनसंचय योजना, हमीपूर्ण उत्पन्नाचा लाभ मिळवा

नवी दिल्ली :

भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) ‘धनसंचय’ नावाची नवीन विमा योजना १४ जून २०२२ पासून सुरू केली आहे. ही योजना वैयक्तिक व बचत जीवन विमा या श्रेणीतील आहे. यात विम्यासोबतच बचतीचा उद्देशही साध्य होतो.

या योजनेत हमीपूर्ण उत्पन्न लाभ मिळतो. ही योजना किमान ५ वर्षे व कमाल १५ वर्षे मुदतीची आहे. लाभाचे अनेक पर्याय योजनेत उपलब्ध आहेत. जोखीम कालावधी सुरू झाल्यानंतर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबास वित्तीय साह्य मिळेल. मृत्यूपश्चात लाभ एकरकमी किंवा हप्त्या-हप्त्याने मिळू शकतात. (वा.प्र)

Web Title: LIC launches dhan sanchay scheme get the benefit of guaranteed income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.