Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC Market Value Rise : एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 01:56 PM2024-07-28T13:56:24+5:302024-07-28T14:02:43+5:30

LIC Market Value Rise : एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले.

LIC Market Value Rise LIC investors earns ₹45000 crores in just 5 days | LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC च्या गुंतवणूकदारांची 'बल्ले-बल्ले', अवघ्या 5 दिवसांत ₹45000 कोटींची मोठी कमाई..!

LIC Market Value Rise : मागील आठवडा Share Market साठी खुप चढ-उतारांनी भरलेला होता. कधी बाजार खुप चांगला व्यवसाय करत होता, तर कधी एकदम कोसळत होता. या गोंधळानंतरही आठवड्याच्या शेवटच्या दिवशी(दि.26) BSE Sensex 728 अंकांनी वाढून 81,332.72 वर बंद झाला. या दरम्यान सेन्सेक्समधील टॉप-10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढले. यापैकी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या LIC ला सर्वाधिक फायदा झाला. LIC च्या गुंतवणूकदारांनी अवघ्या पाच दिवसांत सुमारे 45,000 कोटी रुपये कमावले.

एलआयसीच्या गुंतवणूकदारांची बल्ले-बल्ले
गेल्या आठवड्यातील चढ-उतारादरम्यान सेन्सेक्सच्या टॉप-10 मौल्यवान कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये संयुक्तपणे 1,85,186.51 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यात LIC पहिल्या स्थानावर आहे. एलआयसीचे शेअर्स गेल्या शुक्रवारी 2.51 टक्क्यांनी वाढून 1190 रुपयांवर बंद झाले होते. तर, गेल्या पाच दिवसांच्या ट्रेडिंगमध्ये एलआयसीच्या मार्केट कॅपमध्ये 44,907.49 कोटींची वाढ झाली आणि एकूण मार्केट कॅप 7,46,602.73 कोटी रुपयांवर पोहोचले. 

या कंपन्यांचीही चांगली कामगिरी
एलआयसी व्यतिरिक्त, ज्या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना नफा मिळवून दिला, त्यामध्ये टेक दिग्गज इन्फोसिस दुसऱ्या स्थानावर आहे. इन्फोसिस मार्केट कॅप 35,665.92 कोटी रुपयांनी वाढून 7,80,062.35 कोटी रुपयांवर पोहोचला. तर, ITC चे मार्केट कॅप रु. 35,363.32 कोटींनी वाढऊन रु. 6,28,042.62 कोटींवर पोहोचले. याशिवाय, टाटा समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे बाजार मूल्य 30,826.1 कोटी रुपयांनी वाढून 15,87,598.71 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

HDFC गुंतवणूकदारांनाही फायदा 
दूरसंचार कंपनी भारती एअरटेलदेखील गेल्या आठवड्यात पाच दिवसांच्या ट्रेडिंग दरम्यान कमाईच्या बाबतीत पुढे राहिली. एअरटेलचे बाजारमूल्य 30,282.99 कोटी रुपयांनी वाढून 8,62,211.38 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप 8,140.69 कोटी रुपयांनी वाढून 12,30,842.03 कोटी रुपये झाले आहे.

रिलायन्सला मोठा फटका
रिलायन्स एमकॅपमध्ये 62,008.68 कोटी रुपयांची मोठी घसरण झाली आणि हे 20,41,821.06 कोटी रुपयांवर आले. तर ICICI बँकेचे बाजारमूल्य रु. 28,511.07 कोटींनी घसरून रु. 8,50,020.53 कोटींवर आले. याशिवाय, SBI मार्केट कॅप रु. 23,427.1 कोटींनी घसरून रु. 7,70,149.39 कोटींवर आले.

(टीप-शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्या.)
 

Web Title: LIC Market Value Rise LIC investors earns ₹45000 crores in just 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.