Join us

LICची पैसा वसूल स्कीम, एकदा पैसे गुंतवा आणि आयुष्यभर दरमहा १२ हजार रुपये पेन्शन मिळवा  

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:41 PM

LIC Saral Pension Yojana: सर्वसाधारणपणे निवृत्तीवेतनासाठी तुम्हाला ६० वर्षांपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. एलआयसीच्या जबरदस्त पॉलिसीमध्ये तुम्ही एकरकमी पैसे गुंतवल्यास तुम्ही ४० व्या वर्षापासूनच पेन्शन मिळवू शकता.

नवी दिल्ली - सर्वसाधारणपणे निवृत्तीवेतनासाठी तुम्हाला ६० वर्षांपर्यंत वाट पाहण्याची आवश्यकता नाही. एलआयसीच्या जबरदस्त पॉलिसीमध्ये तुम्ही एकरकमी पैसे गुंतवल्यास तुम्ही ४० व्या वर्षापासूनच पेन्शन मिळवू शकता. तुम्हालाही या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर एलआयसीच्या या स्कीमबाबत जाणून घ्या.

एलआयसीच्या सरल पेन्शन योजनेमध्ये तुम्हाला केवळ पॉलिसी घेताना एकदाच प्रीमियम भरावा लागतो. तसेच एन्युटी मिळवण्यासाठी दोन पर्यायांमधील कुठलाही एक पर्याय निवडावा लागतो. त्यानंतर संपूर्ण जीवनामध्ये तुम्हाला पेन्शन मिळत राहते. तसेच पॉलिसीधारकांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नॉमिनीला सिंगल प्रीमियमची रक्कम परत केली जाते.

सरल पेन्शन योजना एक एमिडिएट एन्युटी प्लॅन आहे. म्हणजेच पॉलिसी घेतल्याबरोबर तुम्हाला पेन्शन मिळणे सुरू होते. ही पॉलिसी घेतल्यानंतर जेवढी पेन्शन मिळते. तेवढीच ती अखेरपर्यंत मिळत राहते. 

ही पेन्शन योजना पॉलिसी घेण्याचे दोन पर्याय आहेत

१ -  सिंगल लाईफ - यामध्ये पॉलिसी कुठल्यातरी एका व्यक्तीच्या नावावर राहते. जोपर्यंत पेन्शनर जिवंत राहतो. तोपर्यंत त्याला पेन्शन मिळत राहते. त्याच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्यांच्या नॉमिनीला परत दिली जाते.

२ - जॉईंट लाईफ - यामध्ये दोन्ही जीवनसाथींची कव्हरेज होते. जोपर्यंत प्रायमरी पेन्शनर जीवंत राहतो, तोपर्यंत त्यांवा पेन्शन मिळत राहते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या जोडीदाराला आयुष्यभर पेन्शन मिळत राहते. तसेच त्यांच्या मृत्यूनंतर बेस प्रीमियमची रक्कम त्यांच्या नॉमिनीला दिली जाते.या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला किमान ४० वर्षे आणि कमाल ८० वर्षे आहे. ही संपूर्ण जीवनभराची पॉलिसी असल्याने यामध्ये पेन्शन संपूर्ण जीवनभर मिळते. सरल पेन्शन योजना पॉलिसी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांपर्यंतही सरेंडर केली जाऊ शकते.

या योजनेंतर्गत एन्युटीचा भरणा करण्यासाठी तुम्हाला चार पर्याय मिळतात. त्याअंतर्गत तुमचा भरणा मासिक, दर तीन महिन्यांनी घेऊ शकता. किंवा दर सहा महिन्यांनी घेऊ शकता. तुम्ही जो पर्याय निवडाल, त्यात तुमचा भरणा त्या काळात केला जाईल.

सरल पेन्शन योजनेंतर्गत जर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन हवी असेल तर किमान १०० रुपये पेन्शन घ्यावी लागेल. तीन महिन्यांचे ३ हजार रुपये, सहा महिन्यांचे सहा हजार रुपये आणि १२ महिन्यांचे १२ हजार रुपये किमान पेन्शन घ्यावी लागेल. कमाल रकमेची कुठलीही मर्यादा नाही आहे. एलआयसी कॅलेंडरनुसार जर तुम्ही ४२ वर्षांचे असाल आणि ३० लाख रुपयांची अॅन्युटी खरेदी केली तर तुम्हाला दर महिन्याला १२ हजार ३८८ रुपये पेन्शन मिळेल. 

टॅग्स :पैसाएलआयसीगुंतवणूक