तुम्हाला एलआयसी (LIC) बाबत माहिती आहेच. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी. या कंपनीवर देशवासियांचा एवढा विश्वास म्हणजे एलआयसीच्या योजनांमधील पैसा बुडत नाही. तसेच मोठा परतावा देखील देतो. या विमा कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून करोडो भारतीयांनी त्यांचे भविष्य सुरक्षित केले आहे. कदाचित तुम्हीही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी किंवा नातेवाईकांनी कोणत्या ना कोणत्या योजनेत गुंतवणूक केली असेल. एलआयसीचे प्लॅनही अनेक आहेत. आपल्याला कोणता सोयीचा, योग्य ते तुम्हाला ठरवायचे आहे, यासाठी तुम्हाला आम्ही आणखी एका प्लॅनबाबत माहिती देणार आहोत, ज्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून लखपती बनू शकता.
LIC ची जीवन लाभ पॉलिसी ही एक नॉन-लिंक्ड योजना आहे. या योजनेचा नंबर 936 आहे. (LIC Plan no 936 ) म्हणजेच ती शेअर बाजारावर अवलंबून नाही आणि म्हणूनच अशा योजना सुरक्षित मानल्या जातात. आता या पॉलिसीमध्ये गुंतवणुकीबद्दल बोलायचे झाले, तर तुम्ही दरमहा २३३ रुपये गुंतवून मॅच्युरिटीवर १७ लाख रुपये मिळवू शकता, म्हणजे रोज ८ रुपयांपेक्षा कमी रुपये गुंतवावे लागणार आहेत.
या योजनेची विशेष बाब म्हणजे यामध्ये गुंतवणुकीचे किमान वय फक्त आठ वर्षे आहे, म्हणजेच ही पॉलिसी अल्पवयीन व्यक्तीसाठीही घेतली जाऊ शकते. त्याच वेळी, यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल वय 59 वर्षे आहे. पॉलिसीची मुदत 16 ते 25 वर्षांच्या कालावधीसाठी घेतली जाऊ शकते.
एलआयसीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने 21 वर्षांसाठी पॉलिसीची मुदत निवडली, तर पॉलिसी घेताना त्याचे वय 54 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. त्याच वेळी, 25 वर्षांच्या पॉलिसी टर्मसाठी व्यक्तीची वयोमर्यादा 50 वर्षे आहे. पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीदरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाल्यास, नॉमिनीला लाभ मिळतो. नॉमिनीला बोनस तसेच विम्याच्या रकमेचा लाभ मिळतो. या योजनेच्या इतर फायद्यांमध्ये कर सूट समाविष्ट आहे.