Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC Policy Rules : एलआयसीकडून तब्बल ३२ पॉलिसींमध्ये बदल; 'या' लोकांना बसणार सर्वाधिक फटका

LIC Policy Rules : एलआयसीकडून तब्बल ३२ पॉलिसींमध्ये बदल; 'या' लोकांना बसणार सर्वाधिक फटका

LIC Policy Rules : तुम्ही जर एलआयसीची नवीन पॉलिसी खरेदी करणार असाल तर बदलेले नियम माहिती असणे आवश्यक आहे. या बदलांचा परिणाम वृद्ध लोकांवर जास्त होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 10:37 AM2024-10-14T10:37:50+5:302024-10-14T10:38:50+5:30

LIC Policy Rules : तुम्ही जर एलआयसीची नवीन पॉलिसी खरेदी करणार असाल तर बदलेले नियम माहिती असणे आवश्यक आहे. या बदलांचा परिणाम वृद्ध लोकांवर जास्त होणार आहे.

lic policy change rules old age policyholder affected with new updates | LIC Policy Rules : एलआयसीकडून तब्बल ३२ पॉलिसींमध्ये बदल; 'या' लोकांना बसणार सर्वाधिक फटका

LIC Policy Rules : एलआयसीकडून तब्बल ३२ पॉलिसींमध्ये बदल; 'या' लोकांना बसणार सर्वाधिक फटका

LIC Policy Rules : सध्या बाजारात विविध पॉलिसी देणाऱ्या डझनभर कंपन्या उपलब्ध आहे. मात्र, अजूनही लोकांच्या मनात एलआयसीच पहिल्यांदा येते. जर तुम्ही एलआयसी पॉलिसी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला कंपनीने अलीकडेच केलेल्या बदलांची माहिती हवी. या बदलांनुसार, एलआयसीने आपल्या नवीन एंडॉवमेंट प्लॅनमध्ये प्रवेशाचे वय ५५ वर्षांवरून ५० वर्षे केले आहे. हा निर्णय वृद्धांसाठी तोट्याचा ठरू शकतो. कारण आता ते ५० वर्षांनंतर या योजनेत प्रवेश करू शकणार नाहीत. याशिवाय, प्रीमियम दरांमध्येही सुमारे १०% वाढ करण्यात आली आहे, ज्यामुळे पॉलिसीधारकांवर अतिरिक्त आर्थिक बोजा वाढणार आहे.

हा नियम लागू
एलआयसीने १ ऑक्टोबर २०२४ पासून हे बदल लागू केले आहेत. विमा उद्योगातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की कंपनीने हे पाऊल आपली जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने उचलले आहे. कारण या वयानंतर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता जास्त असते. एलआयसीचा नवीन एंडॉवमेंट प्लॅन-९१४ केवळ संरक्षण कवच प्रदान करत नाही तर ती एक बचत योजना देखील आहे. यामध्ये, मृत्यू झाल्यास कुटुंबाला पेमेंट केले जाते. तर पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर परिपक्वता लाभ मिळतो.

एलआयसीच्या ६ योजना
एलआयसीकडे एकूण ६ एंडॉवमेंट योजना आहेत, ज्यात सिंगल प्रीमियम एंडॉवमेंट प्लॅन, नवीन जीवन आनंद, जीवन लक्ष्य, जीवन लाभ आणि अमृतबाल सारख्या लोकप्रिय योजनांचा समावेश आहे. १ ऑक्टोबरपासून या सर्व प्लॅनमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत.

यासोबतच एलआयसीने आपल्या सरेंडर व्हॅल्यू नियमांमध्ये बदल केले आहेत. हे नवीन नियम सुमारे ३२ विमा उत्पादनांना लागू होणार आहेत. नवीन नियमांनुसार, काही पॉलिसीधारकांना योजनेतून बाहेर पडल्यावर मिळणाऱ्या रकमेत कपात होऊ शकते.

एलआयसीने आपल्या नवीन जीवन आनंद आणि जीवन लक्ष्य योजनांमध्ये विम्याची रक्कम १ लाख रुपयांवरून २ लाख रुपये केली आहे. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या एंडॉमेंट योजनांमध्ये केवळ ६ ते ७ टक्के वाढ केली आहे, ज्यामुळे त्यांचे प्रीमियम दर तुलनेने कमी आहेत. एलआयसीच्या या बदलांबाबत कंपनीने अद्याप कोणतेही अधिकृत विधान दिलेले नाही. हे बदल वृद्ध लोकांसाठी खूप महत्वाचे आहेत. कारण ते त्यांच्या विमा संरक्षणावर परिणाम करू शकतात.

Web Title: lic policy change rules old age policyholder affected with new updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.