नवी दिल्ली : LIC Policy Services: आत्तापर्यंत तुम्हाला भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी (LIC) पॉलिसीबद्दल कोणत्याही माहितीसाठी एजंट्सकडे फेऱ्या माराव्या लागतात. मात्र, आता तुम्हाला पॉलिसीशी संबंधित माहितीसाठी त्रास करून घेण्याची गरज नाही. आता तुम्ही एका कॉलमध्ये सर्व माहिती मिळवू शकता.
एलआयसीसंबंधी सर्व अपडेट एका कॉलवर
एलआयसी आता आपल्या ग्राहकांना नवीन सुविधा देत आहे. या अंतर्गत, पॉलिसीशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती किंवा अपडेटसाठी तुम्हाला एलआयसी एजंटला भेट देण्याची आवश्यकता नाही. आता तुम्हाला तुमच्या एका कॉलवर एलआयसी पॉलिसी, कोणतीही नवीन स्कीम किंवा जुन्या स्कीममध्ये कोणताही नवीन बदल संबंधित सर्व माहिती मिळेल. यासाठी तुम्हाला एक सोपी प्रक्रिया फॉलो करावी लागेल.
जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया...
1. यासाठी तुम्हाला प्रथम भारतीय आयुर्विमा महामंडळच्या अधिकृत वेबसाइटवर तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागेल.
2. यासाठी तुम्हाला प्रथम भारतीय आयुर्विमा महामंडळच्या अधिकृत वेबसाइट www.licindia.in वर जावे लागेल.
3. यानंतर तुम्हाला होम पेजच्या सर्वात वरती कस्टमर सर्व्हिस नावाची कॅटगरी दिसेल.
4. आता तुम्ही या कॅटगरीवर क्लिक करा. आता तुम्हाला स्क्रीनवर आणखी अनेक सब-कॅटगरी दिसतील.
5. आता तुम्ही या कॅटगरीमध्ये 'अपडेट युवर कॉन्टॅक्ट डिटेल्स' या ऑप्शनवर क्लिक करा.
6. आता तुम्ही नवीन पेजवर जाल. या पेजवर तुम्हाला विचारलेली सर्व माहिती भरा.
7. सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला डिक्लेरेशनबद्दल विचारले जाईल आणि त्यावर YES केल्यानंतर, राइट क्लिक करा आणि सबमिट करा.
पॉलिसी डिटेल्स देणे गरजेचे...
1. ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, तुम्ही विद्यमान एलआयसी ग्राहक असल्यास, तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक विचारला जाईल.
2. येथे तुमचा पॉलिसी नंबर टाकल्यानंतर, व्हॅलिडेट पॉलिसी डिटेल्सवर क्लिक करा आणि पॉलिसी नंबर व्हेरिफाय करा.
3. या प्रक्रियेनंतर तुमचा कॉन्टॅक्ट डिटेल अधिकृत वेबसाइटवर अपडेट केला जाईल.
4. यानंतर, तुम्हाला तुमच्या फोनवर एलआयसी पॉलिसी, कोणतीही नवीन पॉलिसी किंवा जुन्या पॉलिसीमधील कोणत्याही अपडेटशी संबंधित सर्व माहितीबद्दल नोटिफिकेशन येतील.