नवी दिल्ली : एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ही देशातील सर्वात मोठ्या विमा कंपन्यांपैकी एक आहे. आजही देशात एक मोठा वर्ग आहे, जो आपले पैसे LIC मध्ये गुंतवण्यास प्राधान्य देतो. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळतो. तसेच पैशाची सुरक्षितता वाटते. LIC मध्ये पैसे बुडण्याचा धोका नगण्य आहे, कारण सरकार तुमच्या पैशांची हमी देते.
LIC देशातील प्रत्येक घटकाच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पॉलिसी घेऊन येत असते. त्यापैकी एक LIC जीवन लक्ष्य पॉलिसी आहे. या पॉलिसीत, तुमच्या अत्यंत कमी गुंतवणुकीवर बंपर परताव्याची हमी दिली जाते. LIC जीवन लक्ष्य पॉलिसी ही एक जीवन विमा योजना आहे, ज्यामध्ये पॉलिसीधारकाला वार्षिक उत्पन्न लाभ मिळतो. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन ही पॉलिसी तयार करण्यात आली आहे.
पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, पैसे नॉमिनीला दिले जातात. विशेष बाब म्हणजे नॉमिनीला मॅच्युरिटीची पूर्ण रक्कम मिळते. या पॉलिसीत विमाधारकाला किमान 1 लाख रुपयांची विमा रक्कम मिळते. विमाधारक ही योजना 13 ते 25 वर्षांच्या दरम्यान घेऊ शकतो. या विम्यामध्ये तुम्ही 1, 3, 6 किंवा 12 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रीमियम जमा करू शकता. तुम्ही ही पॉलिसी कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 50 वर्षांसाठी घेऊ शकता. तसेच, तुम्ही त्याची मॅच्युरिटी रक्कम कमाल वयाच्या 65 वर्षापर्यंत घेऊ शकता.
172 रुपये गुंतवून दरमहा 28.5 लाखांचा मिळवा परतावा दरम्यान, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी 25 वर्षांचा प्लॅन निवडला तर तुम्हाला मॅच्युरिटीवर जवळपास 28.5 लाख रुपये मिळतील. यासाठी तुम्हाला दरमहा 5,169 रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच, तुम्हाला दररोज जवळपास 172 रुपये गुंतवावे लागतील. त्यानंतर वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही संपूर्ण 28.5 लाख रुपयांचे मालक व्हाल. विशेष म्हणजे, पॉलिसीच्या शेवटच्या तीन वर्षांसाठी तुम्हाला कोणताही प्रीमियम भरावा लागणार नाही.