Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC Policy Rules : एलआयसी पॉलिसी घेण्याचे बदलले नियम; जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान!

LIC Policy Rules : एलआयसी पॉलिसी घेण्याचे बदलले नियम; जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान!

LIC Policy Rules : साधारणपणे लोक आपल्या जोडीदाराला आपला नॉमिनी बनवतात.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 06:53 PM2022-09-26T18:53:54+5:302022-09-26T18:54:57+5:30

LIC Policy Rules : साधारणपणे लोक आपल्या जोडीदाराला आपला नॉमिनी बनवतात.

lic policy rules new life insurance policy nominee benefits see here how to change your nominee | LIC Policy Rules : एलआयसी पॉलिसी घेण्याचे बदलले नियम; जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान!

LIC Policy Rules : एलआयसी पॉलिसी घेण्याचे बदलले नियम; जाणून घ्या, अन्यथा होईल मोठे नुकसान!

नवी दिल्ली : तुम्ही एलआयसी पॉलिसी घेत असाल किंवा तुम्ही ती घेतली असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. पॉलिसी खरेदी करताना, तुमच्या कुटुंबातील सदस्याला नॉमिनी (Life Insurance Policy Nominee) बनवले आवश्यक आहे. आता हा नियमही अनिवार्य झाला आहे. जर तुम्ही पॉलिसी घेताना नॉमिनी केले नसेल आणि तुमच्यासोबत एखादी दुर्घटना घडली असेल, तर तुमच्या कुटुंबीयांना रकमेपासून वंचित राहावे लागू शकते. म्हणजेच याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पॉलिसीचा क्लेम मिळण्यात कुटुंबाला कोणतीही अडचण येणार नाही आणि अनावश्यक विवाद सुद्धा टाळता येतील.

साधारणपणे लोक आपल्या जोडीदाराला आपला नॉमिनी बनवतात. पण जर तुम्हाला तुमचे पैसे दोन लोकांमध्ये विभागायचे असतील. जसे पत्नी आणि मुलगा किंवा पत्नी आणि भाऊ किंवा आई. अशावेळी, तुम्ही एकापेक्षा जास्त पॉलिसी खरेदी करू शकता आणि दोन पॉलिसींसाठी वेगवेगळे नॉमिनी तयार करू शकता. किंवा पॉलिसी खरेदी करताना तुम्ही एकापेक्षा जास्त व्यक्तींचा हिस्सा ठरवू शकता आणि त्यांना नॉमिनी बनवू शकता. यासाठी पॉलिसी खरेदी करताना विमा कंपनीकडून लेखी हमीपत्र घेतले जाऊ शकते.

पॉलिसी घेताना नॉमिनीचे नाव ठरवा. परंतु लक्षात ठेवा की पॉलिसीसाठी योग्य नॉमिनी निवडणे देखील खूप महत्वाचे आहे. जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य असाल, तर तुमच्या अनुपस्थितीत आर्थिक जबाबदारी घेण्यास सक्षम असलेल्या नॉमिनीसाठी कुटुंबातील व्यक्ती निवडा. बहुतेक ही जबाबदारी जोडीदाराने उचलली जाते, मग तुम्ही त्याला नॉमिनी करू शकता. अशा परिस्थितीत तुमच्या कुटुंबातील सदस्यांना नक्कीच मदत मिळेल.

वेळेनुसार नॉमिनी बदलू शकता...
- पॉलिसीधारक वेळोवेळी नॉमिनी (How To Change Nominee) देखील बदलू शकतो.
- जर नॉमिनी मरण पावला किंवा त्याला रोजगार मिळाला आणि दुसर्‍या सदस्याला जास्त पैशांची गरज असेल, तर नॉमिनी बदलला जाऊ शकतो.
- याशिवाय, विवाह किंवा घटस्फोट झाल्यास नॉमिनी देखील बदलू शकतो.
- यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या वेबसाइटवरून नॉमिनी फॉर्म डाउनलोड करा किंवा ऑफिसमधून हा फॉर्म घ्या.
- फॉर्ममध्ये नॉमिनी व्यक्तीचे डिटेल्स भरा.
- आता पॉलिसीच्या डॉक्युमेंट्सची कॉपी आणि नॉमिनीसोबतच्या तुमच्या नातेसंबंधाचे डॉक्युमेंट्स जोडून सबमिट करा.
- जर एकापेक्षा जास्त नॉमिनी असतील तर प्रत्येकाचा हिस्सेदारी सुद्धा ठरवा.

Web Title: lic policy rules new life insurance policy nominee benefits see here how to change your nominee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.