भारतीय जीवन विमा निगम (LIC) ला आपल्या पॉलिसीधारकांना आयपीओतील शेअर द्यायचे आहेत. यासाठी एलआयसीने पॉलिसीधारकांना सूचना दिली आहे. ज्या पॉलिसीधारकांना एलआयसीचे शेअर घ्यायचे आहेत त्यांनी या गोष्टी कराव्यात असा सल्ला एलआयसीने दिला आहे.
एलआयसी आयपीओतील 10 टक्के शेअर पॉलिसीधारकांना राखीव ठेवणार आहे. यासाठी पॉलिसीधारकांना एलआयसीकडे पॅनकार्डची माहिती अपडेट करावी लागणार आहे. तसेच कोणत्याही आयपीओमध्ये भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला डीमॅट अकाऊंट उघडावे लागणार आहे. यामुळे एलआयसीचे शेअर घेण्यासाठी पॉलिसीधारकांना डीमॅट अकाऊंट उघडावे लागणार आहे. या दोन गोष्टी केल्यावर एलआयसीचे शेअर पॉलिसीधारकांना घेता येणार आहेत.
एलआसीच्या आयपीओला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. परंतू एलआयसीने त्याची तयारी सुरु केली आहे. एलआयसीने पॉलिसीधारकांना जाहिरात प्रसिद्ध करून आयपीओमध्ये शेअर घेण्यासाठी केवायसी अपडेट करण्यास सांगितले आहे. तसेच डीमॅट अकाऊंट पॉलिसीधारकांना स्वत:चे स्वत:च उघडावे लागणार आहे. यासाठी जे शुल्क लागेल त्याची जबाबदारी एलआयसीची राहणार नाही, पॉलिसीधारकांनाच हे शुल्क अदा करावे लागणार आहे.
अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सांगितलेले की, एलआयसीचा आयपीओ 2021-22 मध्ये येईल. केंद्र सरकारने एलआयसीमधील आपला हिस्सा विकून 1.75 लाख कोटी रुपये गोळा करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
संबंधित बातम्या...
LIC चे मूल्यांकन डिसेंबरपर्यंत होणार; ‘या’ महिन्यात IPO येणार, मोदी सरकार १ लाख कोटी उभारणार