Join us  

LIC च्या दोन योजना ३१ मार्चपासून बंद होणार, तुमचेही पैसे यात गुंतले असतील जाणून घ्या डिटेल्स...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 8:53 PM

LIC Schemes: भारतीय आर्युविमा महामंडळात (LIC) देशातील कोट्यवधी लोकांचे पैसे गुंतलेले आहेत.

LIC Schemes: भारतीय आर्युविमा महामंडळात (LIC) देशातील कोट्यवधी लोकांचे पैसे गुंतलेले आहेत. देशातील या सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या अनेक पॉलिसी आहेत. पण यातील दोन पॉलिसी येत्या ३१ मार्चपासून बंद होणार आहेत. पंतप्रधान वंदना व्यय योजना  (Pradhan Mantri Vaya Vandana Yojana- PMVVY) आणि एलआयसी धन वर्षा योजना (LIC Dhan Varsha Scheme) या दोन योजना ३१ मार्च २०२३ पासून बंद होणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घेऊयात..

Pradhan Mantri Vaya Vandana Yojana- PMVVYएलआयसीची ही पेन्शन योजना आहे. ३१ मार्च रोजी सरकार ही योजना बंद करणार आहे. म्हणजे आपण जर या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर त्यासाठी शेवटचे १० दिवस शिल्लक राहिले आहेत. यामध्ये, गुंतवणूकदारांना मासिक गुंतवणूकीवर दरवर्षी ७.४ टक्के व्याज दर मिळतो. आपण ३१ मार्च २०२३ पर्यंत पेन्शनच्या या दराचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारने पंतप्रधान व्ही वंदना नावाची पेन्शन योजना सुरू केली आहे, जी ४ मे २०१७ रोजी सुरू झाली. यात वर्षाकाठी १.२० लाख रुपये पेन्शन मिळते.

LIC Dhan Varsha Scheme- एलआयसी धन वर्षा योजना ही एक लिंक्ड, वैयक्तिक, बचत आणि सिंगल प्रीमियम विमा योजना आहे. आपल्याला एलआयसीच्या मनी रेन योजनेंतर्गत दोन गुंतवणूकीचे पर्याय मिळतात. पहिल्या पर्यायात प्रिमियमच्या १.२५ पर्यंत परतावा मिळतो आणि दुसऱ्या पर्यायात पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबाला १० पटीनं परतावा मिळतो.

टॅग्स :एलआयसी