Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा

LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा

LIC Q4 Results: LIC Q4 Results:  देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळानं म्हणजेच एलआयसीनं (LIC) सोमवारी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जाणून घ्या, कंपनीला किती झाला नफा आणि किती नवे ग्राहक कंपनीनं जोडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 11:59 AM2024-05-28T11:59:46+5:302024-05-28T12:00:35+5:30

LIC Q4 Results: LIC Q4 Results:  देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळानं म्हणजेच एलआयसीनं (LIC) सोमवारी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. जाणून घ्या, कंपनीला किती झाला नफा आणि किती नवे ग्राहक कंपनीनं जोडले.

LIC Q4 Results Profit Income Dividend How is LIC s fourth quarter report card , how much profit was made how many policies were sold see entering into new business | LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा

LIC Q4 Results: प्रॉफिट, इन्कम, डिविडेंड... कसं आहे LIC चं चौथ्या तिमाहीचं रिपोर्टकार्ड? किती झाला नफा, किती पॉलिसींची झाली विक्री? पाहा

LIC Q4 Results:  देशातील सर्वात मोठी आयुर्विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळानं म्हणजेच एलआयसीनं (LIC) सोमवारी ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. एलआयसीला चौथ्या तिमाहीत १३,७८२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या याच कालावधीतील १३,१९१ कोटी रुपयांच्या तुलनेत यात ४.५ टक्क्यांची वाढ झालीये. याव्यतिरिक्त, कंपनीने प्रति शेअर ६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केलाय.
 

फर्स्ट इयर प्रीमियम इनकममध्ये (एफवायपीआय) एलआयसीनं भारतीय आयुर्विमा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून आपलं स्थान कायम राखलं आहे. कंपनीच्या फायलिंगनुसार, कंपनीचा एकूण मार्केट शेअर ५८.८७% आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एलआयसीचा वैयक्तिक व्यवसायात ३८.४४ टक्के आणि समूह व्यवसायात ७२.३० टक्के बाजार हिस्सा होता.
 

एकूण प्रीमियम उत्पन्नात वाढ
 

आर्थिक वर्ष २०२३-२४ साठी एलआयसीनं एकूण ४,७५,०७० कोटी रुपयांचं प्रीमियम उत्पन्न नोंदवलं. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षातील ४,७४,००५ कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण किंचित जास्त आहे. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात एकूण वैयक्तिक व्यवसाय प्रीमियम ३,०३,७८६ कोटी रुपयांवर पोहोचला, जो मागील वर्षी याच कालावधीत २,९२,७६३ कोटी रुपये होता.
 

समीक्षाधीन कालावधीत समूह व्यवसायाचं एकूण प्रीमियम उत्पन्न १,७१,३०२ कोटी रुपये होतं. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षाच्या १,८१,२४२ कोटी रुपयांपेक्षा हे कमी आहे. मार्च २०२४ पर्यंत एलआयसीच्या असेट्स अंडर मॅनेजमध्ये (AUM) वाढ होऊन ५१,२१,८८७ कोटी रुपये झाली आहे. मार्च २०२३ पर्यंत नोंदवलेल्या ४३,९७,२०५ कोटी रुपयांपेक्षा हे प्रमाण अधिक आहे. त्यात वार्षिक आधारावर १६.४८ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.


आर्थिक वर्षात किती पॉलिसींची विक्री?
 

३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात वैयक्तिक विभागात एकूण २,०३,९२,९७३ पॉलिसींची विक्री झाली. ३१ मार्च २०२३ रोजी संपलेल्या वर्षात विकल्या गेलेल्या २,०४,२८,९३७ पॉलिसींपेक्षा ही संख्या किंचित कमी आहे.

Web Title: LIC Q4 Results Profit Income Dividend How is LIC s fourth quarter report card , how much profit was made how many policies were sold see entering into new business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.