Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC ची जबरदस्त स्कीम : जमा करा केवळ २५०० रुपयांचा मासिक हप्ता, मिळतील ९५०००० रुपये

LIC ची जबरदस्त स्कीम : जमा करा केवळ २५०० रुपयांचा मासिक हप्ता, मिळतील ९५०००० रुपये

एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला मिळेल जबरदस्त परतावा. पाहा कोणती आहे ही स्कीम.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2023 12:24 PM2023-01-22T12:24:31+5:302023-01-22T12:25:12+5:30

एलआयसीच्या या स्कीममध्ये तुम्हाला मिळेल जबरदस्त परतावा. पाहा कोणती आहे ही स्कीम.

LIC s Awesome Scheme Deposit Only Rs 2500 monthly Installment Get Rs 95000 lic jeevan anand policy | LIC ची जबरदस्त स्कीम : जमा करा केवळ २५०० रुपयांचा मासिक हप्ता, मिळतील ९५०००० रुपये

LIC ची जबरदस्त स्कीम : जमा करा केवळ २५०० रुपयांचा मासिक हप्ता, मिळतील ९५०००० रुपये

देशातील सर्वात मोठ्या सरकारी विमा कंपनी LIC वर देशातील जनतेचा मोठा विश्वास आहे. सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणून याकडे देशातील लोक पाहतात. सर्वात मोठी विमा कंपनी असल्याने, एलआयसीकडे एकापेक्षा सरस प्रोडक्ट्स आहेत. यामध्ये सुरक्षित गुंतवणूकीसह चांगला परतावाही मिळतो. आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका प्लॅनबद्दल सांगत आहोत. या प्लॅनमध्ये महिन्याला केवळ २५०० रुपये जमा करून, तुम्ही ९.५० लाख इतका मोठा निधी जमा करू शकता. जाणून घेऊया काय आहे ही योजना.

एलआयसीच्या या योजनेचे नाव जीवन आनंद आहे. कंपनीचा हा प्लॅन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे यात अगदी कमी गुंतवणूक करूनही तुम्हाला प्रचंड परतावा मिळू शकतो. दुसरीकडे, पॉलिसीच्या मुदतपूर्तीपूर्वी तुम्हाला काही झाले तर तुमच्या कुटुंबाला उर्वरित हप्ता भरण्याची गरज नाही.

असा जमा होईल लाखाचा निधी
जर तुमचे वय ३५ वर्षे असेल आणि तुम्ही ही पॉलिसी ५ लाख रुपयांसाठी २० वर्षांसाठी घेतली असेल. २० वर्षांच्या पॉलिसीचा एक वर्षाचा हप्ता सुमारे ३० हजार रुपये येतो. त्यानुसार, तुमचा मासिक हप्ता 2500 रुपये येईल. वयाच्या ३५ व्या वर्षी आणि २० वर्षांच्या पॉलिसीसाठी तुम्ही एकूण ५ लाख रुपये जमा करता. त्या बदल्यात तुम्हाला २२५०० रुपयांचे २० हप्ते म्हणजे ४,५०,०० रुपये मिळतील. तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला ५ लाख आणि ४.५ लाख रुपये मिळतील. त्यामुळे यानुसार तुम्हाला २५०० रुपयांच्या गुंतवणुकीवर एकूण ९.५० लाख रुपये मिळू शकतात.

हाही मिळेल लाभ
एलआयसीच्या जीवन आनंद वर, तुम्हाला ९.५ लाख रुपयांव्यतिरिक्त एकूण विमा रकमेवर ४५/१००० चा रिव्हर्सल बोनस मिळेल. दरवर्षी तुम्हाला रिव्हर्सल बोनस अंतर्गत २२,५०० रुपये मिळतील. याशिवाय, तुम्हाला १० हजार रुपयांचा अंतिम अतिरिक्त बोनस देखील मिळेल. एलआयसीची ही पॉलिसी देशभरात खूप लोकप्रिय आहे. विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबांमध्ये ही लोकप्रिय आहे. तुम्हालाही एलआयसीच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन तपशील तपासू शकता.

Web Title: LIC s Awesome Scheme Deposit Only Rs 2500 monthly Installment Get Rs 95000 lic jeevan anand policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.