Join us

अंबानींच्या 'या' कंपनीत एलआयसीची मोठी गुंतवणूक, LIC च्या शेअरमध्ये तेजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 2:49 PM

कामकाजादरम्यान, एलआयसीच्या शेअर्समध्ये १.७७ टक्क्यांची वाढ होऊन ते ६६३.७० रुपयांवर पोहोचले होते. 

भारतीय आयुर्विमा महामंडळानं (LIC) मुकेश अंबानींच्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये (JFSL) ६.६६ टक्क्यांची गुंतवणूक केली आहे. एलआयसीनं यासंदर्भात शेअर बाजाराला माहिती दिली. ३० जून २०२३ पर्यंत एलआयसीचीरिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये ६.४९ टक्के भागीदारी होती. दरम्यान, मंगळवारी कामकाजादरम्यान, एलआयसीच्या शेअर्समध्ये १.७७ टक्क्यांची वाढ होऊन ते ६६३.७० रुपयांवर पोहोचले होते. 

कंपनीच्या बाबतीत JFSL रिलायन्स इंडस्ट्रीजची एक फायनान्शिअल फर्म आहे. JFSL यापूर्वी रिलायन्स स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टमेंट लिमिटेडच्या नावानं ओळखली जात होती. रिलायन्सनं डी मर्जर प्रक्रियेअंतर्गत हा व्यवसाय वेगळा केला होता. ही नवी कंपनी बीएसई आणि एनएसईवर लिस्टही झाली आहे. २१ ऑगस्ट रोजी जेएफएसएलनं शेअर बाजारात लिस्ट झाली. सलग दुसऱ्या दिवशी कंपनीच्या शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं आहे. 

आठवड्याच्या कामकाजाच्या दुसऱ्या दिवशीही, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरला लोअर सर्किट लागलं आणि बीएसईवर तो घसरून २३९.२० रुपयांवर आला. त्याच वेळी, एनएसईवर, स्टॉक ५ टक्क्यांच्या लोअर सर्किटसह सर्किटसह २३६.४५ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला. Jio Financial च्या लिस्टिंगपूर्वी मूल्यांकन करण्यासाठी गेल्या महिन्यात झालेल्या एका विशेष सत्रात शेअरची किंमत किंमत २६१.८५ रुपये निश्चित करण्यात आली होती. सध्या कंपनीचं बाजार भांडवल १,५१,९७०.५६ रुपये आहे.

टॅग्स :एलआयसीमुकेश अंबानीरिलायन्स