Join us

LIC Pension Yojana: एकदाच प्रिमिअम भरा, आयुष्यभर पेन्शन मिळणार; LIC ची खास योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 16:08 IST

LIC Saral Pension Yojana:  एलआयसीच्या या प्लॅनला मध्यवर्ती वार्षिक योजना असे देखील म्हटले जाते. या योजनेबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळते.

एलआयसीची (LIC) एक खास प़ॉलिसी आहे. यामध्ये एकदाच प्रमिअम भरायचा आहे आणि आयुष्यभर पेन्शन मिळवायची आहे. या स्कीमचे अनेक फायदे देखील आहेत. एलआयसीच्या या खास पेन्शनचे नाव आहे सरळ पेन्शन प्लॅन (LIC Saral Pension Yojana in Marathi). चला जाणून घेऊया. 

एलआयसीच्या या प्लॅनला मध्यवर्ती वार्षिक योजना असे देखील म्हटले जाते. या योजनेबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता पहायला मिळते. एलआयसीच्या या योजनेत 40 ते 80 वर्षे वयाचे लोकच पैसे गुंतवू शकतात. या योजनेसाठी तुम्हाला एकदाच मोठी रक्कम भरावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला रिटायर झाल्यावर याचा लाभ मिळत राहील. LIC च्या या स्कीमचे अनेक फायदेही आहेत. याचा लाभ तुम्हाला रिटायरमेंटवेळी मिळेल. 

सरळ पेन्शन योजनेत तुम्हाला दोन पर्याय मिळतात. पहिल्या पर्यायात सिंगल खाते असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पेन्शन बंद केली जाईल. दुसऱ्या स्कीममध्ये जॉईंट खाते उघडले जाऊ शकते. यामध्ये एकाच्या मृत्यूनंतर दुसऱ्या व्यक्तीला पेन्शन मिळत राहणार आहे. एलआयसीची सरळ विमा योजना घ्यायची असेल तर काही गरजेच्या बाबी आहेत. यावर लक्ष द्यावे लागेल. अर्जदार भारताचा नागरिक असणे गरजेचे. त्याचे वय 40 ते 80 वर्षे असावे. या योजनेत कमीतकमी रक्कम 1000 रुपये भरता येतात. तर जास्तीत जास्त रकमेला कोणतीही मर्यादा नाही. 

अर्ज कसा कराल...अर्ज करण्यासाठी तुम्हाला LIC च्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. यानंतर सरळ पेन्शन योजनेवर अर्ज करण्यासाठी क्लिक करावे लागेल. आता तुम्हाला अर्जामध्ये आवश्यक माहिती भरावी लागेल. यानंतर सबमिट करावे लागेल. यानंतर तुमच्या फॉर्मवर कार्यवाही केली जाईल.

टॅग्स :एलआयसी