भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC नं अदानी समूहाच्या तीन कंपन्यांचे शेअर्स विकल्याची माहिती समोर आलीये. डिसेंबर तिमाहीतील शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार एलआयसीनंअदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी एंटरप्रायझेस आणि अदानी पोर्ट्समधील हिस्सा कमी केला आहे. एकूणच, एलआयसीनं या तिमाहीत तीन अदानी समूहाच्या कंपन्यांचे 3,72,78466 समभाग विकले आहेत. एलायसी ही अदानी समुहाच्या सर्वात मोठ्या संस्थागत गुंतवणूकदारांपैकी एक आहे.
अदानी एनर्जी सोल्युशन्स
एलआयसीनं अदानी एनर्जी सोल्युशन्समधील हिस्सा सप्टेंबर तिमाहीत 3.68 टक्क्यांवरून तिसऱ्या तिमाहीत 3 टक्क्यांपर्यंत कमी केला. या तिमाहीत स्टॉक 42 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचे शेअर्स मंगळवारी 2 टक्क्यांनी घसरून 1127 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचं मार्केट कॅप 1,25,827.57 कोटी रुपये आहे.
अदानी एन्टरप्रायझेस
एलआयसीनं अदानी एंटरप्रायझेसमधील आपला हिस्सा 4.23 टक्क्यांवरून 3.93 टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. तिसर्या तिमाहीत स्टॉक जवळपास 29 टक्क्यांनी वधारला होता. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स मंगळवारी किरकोळ घसरले आणि इंट्राडे 3068.65 रुपयांवर पोहोचले. कंपनीचं मार्केट कॅप 3,49,826.44 कोटी रुपये आहे.
अदानी पोर्ट्स
एलआयसीनं अदानी पोर्ट्समधील हिस्साही कमी केला आहे. सप्टेंबर तिमाहीत तो 9.07 वरून तिसऱ्या तिमाहीत 7.86 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आले. या तिमाहीत स्टॉक 46 टक्क्यांपेक्षा अधिक वधारला.
LIC ची अदानी पोर्ट्स मध्ये सर्वात मोठी गुंतवणूक आहे, जिच्या स्टेकची किंमत 20,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अदानी पोर्ट्सच्या शेअर्सबद्दल बोलायचं झालं तर, मंगळवारी इंट्राडे ट्रेडमध्ये किंचित घट होऊन कंपनीचे शेअर्स 1196.05 रुपयांवर व्यवहार करत होते. कंपनीचं मार्केट कॅप 2,58,363.42 कोटी रुपये आहे.