Lokmat Money > बिझनेस न्यूज > एलआयसीने विकले कंपन्यांमधील शेअर्स; इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळविली

एलआयसीने विकले कंपन्यांमधील शेअर्स; इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळविली

एका आकडेवारीनुसार एलआयसीची शेअर मार्केटमध्ये हिस्सेदारी ३.६६ टक्के एवढी कमी झाली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:56 AM2021-05-31T05:56:05+5:302021-05-31T05:56:22+5:30

एका आकडेवारीनुसार एलआयसीची शेअर मार्केटमध्ये हिस्सेदारी ३.६६ टक्के एवढी कमी झाली आहे

LIC sells shares in companies | एलआयसीने विकले कंपन्यांमधील शेअर्स; इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळविली

एलआयसीने विकले कंपन्यांमधील शेअर्स; इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक वळविली

मुंबई : आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आघाडीच्या १० पैकी ८ कंपन्यांमधील समभाग पूर्णपणे विकले आहेत. या कंपन्यांमध्ये एलआयसीच्या हिश्शात मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत सर्वाधिक घसरण झाली होती. एका आकडेवारीनुसार एलआयसीची शेअर मार्केटमध्ये हिस्सेदारी ३.६६ टक्के एवढी कमी झाली आहे. 

‘प्राइम डेटाबेस’च्या आकडेवारीतून ही माहिती उपलब्ध झाली आहे. एलआयसीने टॉप कंपन्यांमधील शेअर्स विकण्यामागे नफा कमाविण्याचा हेतू होता. मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत शेअर बाजार उच्च्चांकी पातळीवर होते. 

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ या तिमाहीत ५ टक्क्यांनी वधारला होता. गेल्यावर्षी मार्चअखेरीस या कंपन्यांमध्ये एलआयसीची हिस्सेदारी ३.८८ टक्के होती. एलआयसीचा आतापर्यंत सर्वोच्च २०१२ मध्ये ५ टक्के एवढा होता. 

एलआयसीने खालील कंपन्यांमधील आपली हिस्सेदारी शून्य केली  आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया, हिंदुस्तान मोटर्स, एचडीएफसी, मारुती सुझुकी, कोटक महिंद्र बँक, एशियन पेंट्स, युनियन बँक ऑफ इंडिया, ज्योती स्ट्रक्चर्स, मोरपॅन लेबॉरेटरीज, आरपीएसजी व्हेंचर्स, इन्सेक्टिबल्स इंडिया, दालमिया भारती शुगर या त्या कंपन्या आहेत.

एलआयसीने काही कंपन्यांमधील हिस्सेदारी शून्य केली असली तरीही काही कंपन्यांमध्ये एलआयसीने हिस्सेदारी वाढविली आहे. रेल विकास निगम लिमिटेड, न्यू इंडिया अश्युरन्स, बजाज ऑटो, टाटा टेलिकम्युनिकेशन्स, अदानी टोटल गॅस, बायोकॉन, अरबिंदो फार्मा इत्यादी कंपन्यांमध्ये एलआयसीची हिस्सेदारी उच्चांकी पातळीवर गेली आहे.

Web Title: LIC sells shares in companies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.