Join us

LIC ने या सिमेंट कंपनीतील शेअर विकले, दिग्गज गुंतवणूकदारानं लावलाय मोठा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2023 1:56 AM

दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याकडे, त्यांचा भाऊ गोपीकिशन दमानी यांच्यासह 31 मार्च पर्यंत इंडिया सिमेंट्समध्ये जवळपास 20.8 टक्के हिस्सेदारी होती. बुधवारी ही हिस्सेदारी 1,363 कोटी रुपये एवढी होती. 

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने (LIC) दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी समर्थित इंडिया सिमेंट्स लिमिटेड मधील आपली गुंतवणूक कमी केली आहे. आता या कंपनीत LIC चा वाटा 3.833 टक्के आहे. 31 मार्च 2023 पर्यंत या कंपनीत LIC चा वाटा 4.42 टक्के एवढा होता. अशा प्रकारे एलआयसीच्या गुंतवणूकीत 58.7 बेसिस पॉईंट्सची घट झाली आहे.

अशी आहे शेअरची स्थिती -  आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात बुधवारी बीएसईवर इंडिया सिमेंट्सचा शेअर 0.19 टक्क्यांनी घसरून 211.45 रुपयांवर आला. हिचे मार्केट कॅप 6,552.78 कोटी रुपये एवढे आहे. आता इंडिया सिमेंटमध्ये LIC ची हिस्सेदारी 3.833 टक्के एवढी आहे. आताच्य किंमतीनुसार, हिस्सेदारी 251 कोटी रुपये एवढी आहे. दिग्गज गुंतवणूकदार राधाकिशन दमानी यांच्याकडे, त्यांचा भाऊ गोपीकिशन दमानी यांच्यासह 31 मार्च पर्यंत इंडिया सिमेंट्समध्ये जवळपास 20.8 टक्के हिस्सेदारी होती. बुधवारी ही हिस्सेदारी 1,363 कोटी रुपये एवढी होती.  मे महिन्यात नुवामा इंस्टिट्यूशनल इक्विटीजने इंडिया सिमेंट्सच्या शेअरमध्ये कपातीचा सल्ला दिला होता. ब्रोकरेजने हाय नेट डेब्ट पाहता, शेअरला टार्गेट प्राइस 112 रुपयांसह 'REDUCE' टॅग दिला होता.

टॅग्स :एलआयसीगुंतवणूकशेअर बाजार