Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC IPO गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! २१ महिन्यांच्या लिस्टिंगनंतर स्टॉकने पहिल्यांदाच इश्यू किंमत पार केली

LIC IPO गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! २१ महिन्यांच्या लिस्टिंगनंतर स्टॉकने पहिल्यांदाच इश्यू किंमत पार केली

विमा कंपनीच्या IPO गुंतवणूकदारांना लिस्टिंगमुळे ८ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला होता. लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच होती. आता गेल्या १० महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 10:03 PM2024-01-30T22:03:38+5:302024-01-30T22:05:55+5:30

विमा कंपनीच्या IPO गुंतवणूकदारांना लिस्टिंगमुळे ८ टक्क्यांहून अधिक तोटा सहन करावा लागला होता. लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच होती. आता गेल्या १० महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये ७५ टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली आहे.

lic share price surpass issue price mark for the first time stock soars 4 percent hdfc bank | LIC IPO गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! २१ महिन्यांच्या लिस्टिंगनंतर स्टॉकने पहिल्यांदाच इश्यू किंमत पार केली

LIC IPO गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा! २१ महिन्यांच्या लिस्टिंगनंतर स्टॉकने पहिल्यांदाच इश्यू किंमत पार केली

गेल्या काही दिवसापासून तोट्यात असलेल्या एलआयसीच्या आयपीओबाबत आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. सुमारे २१ महिन्यांच्या लिस्टिंगनंतर स्टॉकने त्याच्या इश्यू किमतीची पातळी ओलांडली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये आज ३० जानेवारी रोजी ४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली. तो इंट्राडे ९५४.८५ रुपयांच्या पातळीवर पोहोचला. LIC चा IPO मे २०२२ मध्ये आला, तेव्हा त्याची किंमत ९०२-९४९ रुपये निश्चित करण्यात आली होती. आज यात वाढीसह कंपनीचे मार्केट कॅप ५,९१,५१३ कोटी रुपये झाले आहे.

LIC शेअरची लिस्टींग १७ मे २०२२ रोजी झाली. कंपनीचे शेअर्स सवलतीच्या दरात लिस्टेड झाले. एलआयसीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजवर ८.६२ टक्क्यांच्या सवलतीने ८६७.२० रुपयांवर लिस्टेड झाले. तर हा शेअर राष्ट्रीय शेअर बाजारावर ८७२ रुपयांवर लिस्ट झाला.

चीनचे मोठे यश, हाती लागला खजिना; अनेक दशकांपासून सुरू होता याचा शोध

लिस्टिंग झाल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच होती. २९ मार्च २०२३ रोजी बीएसईवर शेअरने ५३०.२० रुपयांच्या नीचांकी पातळी गाठली होती. मात्र, यानंतर एलआयसीच्या शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. गेल्या १० महिन्यांत विमा कंपनीच्या शेअर्समध्ये सुमारे ७५ टक्के तेजी आली आहे.

काही दिवसापूर्वीच एलआयसीला एचडीएफसी बँकेतील ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्यास मंजुरी मिळाली आहे. एलआयसीकडे डिसेंबर २०२३ पर्यंत बँकेत ५.१९ टक्के हिस्सा होता. याचा अर्थ LIC आता बँकेतील ४.८ टक्के अधिक स्टेक खरेदी करू शकते. एलआयसीकडे हिस्सा खरेदी करण्यासाठी एक वर्षाचा कालावधी आहे. आता बँकेचे शेअरही तेजीत आहेत.  LIC चा निव्वळ नफा वार्षिक ५० टक्क्यांनी घसरून Q2FY24 मध्ये ७,९२५ कोटी रुपयांवर आला. मागील वर्षीच्या याच कालावधीत कंपनीने १५,९५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला होता.

Web Title: lic share price surpass issue price mark for the first time stock soars 4 percent hdfc bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.