Lokmat Money > बिझनेस न्यूज > LIC च्या शेअरची कमाल, एका महिन्यात दिला 33 टक्के परतावा; जाणून घ्या, कुठवर जाऊ शकते किंमत

LIC च्या शेअरची कमाल, एका महिन्यात दिला 33 टक्के परतावा; जाणून घ्या, कुठवर जाऊ शकते किंमत

नवी दिल्ली - देशातील सर्वातमोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (LIC) गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज आहे. या वर्षात पहिल्यांदाच कंपनीचा शेअर ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 07:07 PM2023-12-13T19:07:11+5:302023-12-13T19:09:12+5:30

नवी दिल्ली - देशातील सर्वातमोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (LIC) गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज आहे. या वर्षात पहिल्यांदाच कंपनीचा शेअर ...

lic shares surge 33 percent return in one month; Know where the price can go | LIC च्या शेअरची कमाल, एका महिन्यात दिला 33 टक्के परतावा; जाणून घ्या, कुठवर जाऊ शकते किंमत

LIC च्या शेअरची कमाल, एका महिन्यात दिला 33 टक्के परतावा; जाणून घ्या, कुठवर जाऊ शकते किंमत


नवी दिल्ली - देशातील सर्वातमोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या (LIC) गुंतवणूकदारांसाठी गुड न्यूज आहे. या वर्षात पहिल्यांदाच कंपनीचा शेअर 800 रुपयांवर पोहोचा आहे. या शेअरमध्ये बुधवारच्या व्यवहारादरम्यान दोन टक्क्याहून अधिकची तेजी आली आहे. हा शेअर 810 रुपयांवर पोहोचला आहे. हा या शेअरचा गेल्या 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. हा शेअर बीएसईवर 1.65% च्या तेजीसह 804.70 रुपयांवर बंद झाला आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये 33 टक्क्यांची तेजी आली आहे. मात्र अद्यापही तो आपल्या 949 रुपये या इश्यू प्राइसच्या खालीच ट्रेड करत आहे. कंपनीने 21,000 कोटींचा इश्यू आणला होता. जो आतापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे.

अनेक ब्रोकरेज कंपन्यांनी आपल्या ग्राहकांना एलआयसीचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीने नुकतीच जीवन उत्सव नावाची एक नवी पॉलिसी देखील लॉन्च केली आहे.

जिओजित फायनान्शिअलने म्हटले आहे की, कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सना सातत्याने डायव्हर्सिफाय करत असते. एलआयसी ही बाजारपेठेतील अग्रणी कंपनी आहे आणि जनतेमध्ये हिचा विश्वास कायम आहे. यामुळे लॉन्गटर्ममध्ये फायदा होऊ शकतो. गेल्या महिन्यांत ब्रोकरेजने एलआयसीचे टार्गेट प्राइस वाढवून 823 रुपये केले आहे.

अपग्रेडचे रेटिंग -
आर्थिक वर्ष 2024 च्या दुसऱ्या तिमाहीत एलआयसीचे ग्रॉस प्रीमियम इनकम 18.7 टक्क्यांच्या घसरणीसह 107,947 कोटी रुपये होते. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, सिंगल प्रीमियममध्ये 43.3 टक्क्यांची घसरण होती. या कालावधीत कंपनीचा पहिल्या वर्षाचा प्रीमियम 9.3 टक्क्यांनी वाढून 10,032 कोटी रुपये राहिला. तर रिन्यूअल प्रीमियम 6.1 टक्क्यांनी वाढून 59,961 कोटी रुपयांवर पोहोचला. 

Emkay Global ने गेल्या महिन्यात एलआयसीच्या स्टॉकला अपग्रेड करत याला बाय रेटिंग दिले होते. ब्रोकरेजने 760 रुपयांचे टार्गेट प्राइस ठेवले होते. जे या शेअरने यापूर्वीच क्रॉस केले आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: lic shares surge 33 percent return in one month; Know where the price can go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.